लाखनी, लाखांदुरात भाजप, मोहाडीत काँग्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 10:30 PM2018-05-25T22:30:46+5:302018-05-25T22:31:19+5:30

अडीच वर्षांपूर्वी भंडारा जिल्ह्यात नव्याने तीन नगरपंचायती स्थापन झाल्या. त्यावेळी लाखनी व मोहाडी नगर पंचायतीमध्ये काँग्रेसने बहुमत मिळविले होते तर लाखांदुरात भाजपचे बहुमत आहे. त्यानुसार सत्ता स्थापन करण्यात आली होती.

Lakhani, Lakhandur in BJP, Mohadi Congress | लाखनी, लाखांदुरात भाजप, मोहाडीत काँग्रेस

लाखनी, लाखांदुरात भाजप, मोहाडीत काँग्रेस

Next
ठळक मुद्देनगर पंचायत अध्यक्षपद निवडणूक : लाखनीत भाजपने हिसकावली काँग्रेसकडून सत्ता

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अडीच वर्षांपूर्वी भंडारा जिल्ह्यात नव्याने तीन नगरपंचायती स्थापन झाल्या. त्यावेळी लाखनी व मोहाडी नगर पंचायतीमध्ये काँग्रेसने बहुमत मिळविले होते तर लाखांदुरात भाजपचे बहुमत आहे. त्यानुसार सत्ता स्थापन करण्यात आली होती. परंतु अडीच वर्षानंतर दुसऱ्या सत्रासाठी लाखनी नगर पंचायतमध्ये असलेली काँग्रेसची सत्ता आमदार बाळा काशीवार यांनी भाजपकडे हिसकावून लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला धक्का दिला आहे.
लाखनीत सत्तांतर
लाखनी : स्थानिक नगपपंचायतमध्ये नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने झेंडा रोवला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीला बहुमत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाने बंडखोरी केल्यामुळे भाजपाचे पारडे जड झाले. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी भाजपच्या ज्योती निखाडे यांना ९ मते तर काँग्रेसच्या गीता तितीरमारे यांना ८ मते मिळाले. उपाध्यक्षपदासाठी भाजपच्या माया निंबेकर यांना ९ मते तर काँग्रेसचे ईश्वरदत्त गिºहेपुंजे यांना ८ मते मिळाली. काँग्रेस-राकाँचे ९ नगरसेवक व भाजपाचे ८ नगरसेवक असतानीही काँग्रेस-राकाँ आघाडीला पराभव स्वीकारावा लागला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी आर.डी. बेंडे, मुख्याधिकारी कांचन गायकवाड, प्रशासकीय अधिकारी लोकेश कटरे, सुरेश हटवार यांनी काम पाहिले.
मोहाडीत काँग्रेस अविरोध
मोहाडी : स्थानिक नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे बहुमत असल्यामुळे नगराध्यक्ष व उपाध्यक्ष काँग्रेसचे निवडून आले. विरोधी पक्षात असलेले भाजपचे एकही सदस्य सभेला उपस्थित झाले नाही. त्यामुळे १० विरूद्ध ० मतांनी ही निवडणूक पार पडली. अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून गीता बोकडे तर भाजपकडून अपक्ष सायत्रा पारधी यांनी नामनिर्देशनपत्र सादर केले होते. पिठासीन अधिकारी राजेश गायकवाड यांनी बोलविलेल्या सभेत काँग्रेसचे १० सदस्य हजर झाले. त्यामुळे काँग्रेसच्या गीता बोकडे यांची अध्यक्षपदासाठी तर सुनिल गिरीपुंजे यांची उपाध्यक्षपदासाठी सर्वानुमते निवड करण्यात आली. १९ सदस्यीय मोहाडी नगर पंचायतमध्ये दोन सदस्य अपात्र झाले आहेत. दोन स्वीकृत सदस्य आहेत. त्यामुळे १५ सदस्यांनाच मताधिकाराचा अधिकार होता. भाजपचे तीन व एक अपक्ष असे बलाबल आहे. काँग्रेसचे १० सदस्य असून राष्ट्रवादीचा एक सदस्य आहे. यासभेला काँग्रेसच्या रागिणी सेलोकर अनुपस्थित होत्या. यावेळी नगराध्यक्ष स्वाती निमजे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, अमर रगडे, प्रमोद तितीरमारे, विकास भुरे, नागोराव खोब्रागडे, दीपक गजभिये, मंगेश हुमणे, माजी राजन सिंगनजुडे, जितेंद्र सोनकुसरे, मनिषा गायधने, सुनिता सोरते, प्रदीप वाडीभस्मे, गणेश निमजे, कविता बावणे उपस्थित होते.
लाखांदुरात भाजपचे वर्चस्व कायम
लाखांदूर : स्थानिक नगरपंचायतमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या भारती दिवटे यांची अध्यक्षपदी तर भाजपचे प्रल्हाद देशमुख यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. भाजपाने ११-६ ने विजय मिळवून झाले. वर्चस्व कायम ठेवले आहे. अध्यक्षपदाचा अडीच वर्षाच्या कार्यकाळ संपुष्ठात येण्यापूर्वी हे पद अनुसूचित जाती महिलाकरीता राखीव होता. मात्र बहुसंख्येने असलेल्या भाजपकडे महिला नसल्यामुळे अपक्ष निवडून आलेल्या नीलम हुमणे यांचा पक्ष प्रवेश करून अध्यक्षपद दिले होते. हा कार्यकाळ संपल्यानंतर नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिलासाठी राखीव असल्यामुळे भाजपकडून नगरसेविका संगीता गुरुनुले, भारती दिवटे, वनिता मिसार होत्या. काँग्रेसकडून लता प्रधान, दुर्गा पारधी होत्या. भाजपकडून भारती दिवटे यांनी तर काँग्रेसकडून लता प्रधान यांनी नामांकन भरले. दिवटे यांना ११ मते मिळाली. प्रधान यांना ६ मते मिळाली. उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे निकेस दिवटे यांनी तर भाजपकडून प्रल्हाद देशमुख यांनी नामांकन दाखल केले होते. यामध्ये देशमुख यांना ११ मते तर दिवटे यांनी ६ मते घेतली. उपाध्यक्षपदाची निवडणूक ही आश्चर्यकारक ठरली यात उपाध्यक्ष पदाकरीता गटनेते विनोद ठाकरे हे होणार असल्याची चर्चा असताना ऐनवेळी प्रल्हाद देशमुख यांची निवड झाल्याने चर्चांना रंग आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी जी.जी. जोशी, सहायक निवडणूक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी माधुरी मडावी, कर्मचारी विजय करंडेकर यांनी काम पाहिले.

Web Title: Lakhani, Lakhandur in BJP, Mohadi Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.