लाखनी तालुक्यात पाच हजार हेक्टर क्षेत्रात तुडतडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 11:15 PM2017-11-02T23:15:45+5:302017-11-02T23:15:58+5:30

तालुक्यातील खरीप हंगामातील धान उत्पादक शेतकºयांचे शेवटच्या टप्प्यात धान कापणच्या वेळेस तुडतुडा कीड लागल्याने धानपिक नष्ट होत असल्याने ....

Lakhani taluka hit areas in five thousand hectare | लाखनी तालुक्यात पाच हजार हेक्टर क्षेत्रात तुडतडा

लाखनी तालुक्यात पाच हजार हेक्टर क्षेत्रात तुडतडा

Next
ठळक मुद्देशेतकरी त्रस्त : पांढºया रंगाच्या तुडतुड्याचा प्रकोप

चंदन मोटघरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : तालुक्यातील खरीप हंगामातील धान उत्पादक शेतकºयांचे शेवटच्या टप्प्यात धान कापणच्या वेळेस तुडतुडा कीड लागल्याने धानपिक नष्ट होत असल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडले असून उरल्यासुरल्या आशा अपेक्षा संपुष्टात आल्या आहेत.
तालुक्यात तुडतुडा लागल्याने धानकापणीच्या वेळेस शेतकºयांना कीडनाशकांची फवारणी करत असल्याने धान शेतकºयांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. तालुक्यात १९३९३ हेक्टर पेरणीचे क्षेत्र होते. अपुºया पावसामुळे तालुक्यात ३ हजार हेक्टर जमिनीवर रोवणी करण्यात आली नाही. ज् या शेतकºयांनी थोड्या पावसाच्या आधारे व विंधन विहिरीची मदत घेऊन धान रोवणी केली त्या शेतकºयांचे धानपिक कीड व रोगराईने नष्ट केले आहे.
अपुरा पाऊस, बदलते वातावरण, रासायनिक खतांचा वाढता वापर त्यामुळे किडीचे व रोगराईचे प्रमाण वाढले आहे. गेल्या १५ दिवसापासून तालुक्यातील प्रत्येक शेतकरी तुडतुड्यांमुळे हवालदिल झाला आहे. तुडतुड्यामुळे ज्या पिकांची शेतकºयांना आशा होती ती सुद्धा निघून गेले आहे. तणसीशिवाय शेतकºयांच्या हातात काहीही राहिले नाही. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या सर्वेक्षणानुसार तालुक्यातील ४९६५ हेक्टर क्षेत्रात तुडतुड्याचा प्रकोप आहे व हे क्षेत्र रोजचे वाढते आहे. खोडकिड्यामुळे १२९० हेक्टर क्षेत्र रोजचे वाढते आहे. खोडकिड्यामुळे १२९५ हेक्टर क्षेत्र, पाने गुंडाळणारी अळी ३०० हेक्टर, करपा १८१३ हेक्टर, गादमाशी १००१ हेक्टर, कडाकरपा ५१० हेक्टर, पर्णकोष करपा ३४५ हेक्टर, माईटस् ३९ हेक्टर, तुरीची लागवड १४११ हेक्टरमध्ये करण्यात आली असून पाने खाणारी व गुंडाळणारी अळीमुळे ४९५ हेक्टर क्षेत्र प्रभावित झाले आहे.

Web Title: Lakhani taluka hit areas in five thousand hectare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.