जीवनावश्यक सेवेतील वाहन चालकांना लाखनीकरांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 05:00 AM2020-06-04T05:00:00+5:302020-06-04T05:00:02+5:30
आता लॉकडाऊनने सर्व ठप्प आहे. परंतु लोकांच्या गरजा भागविण्यासाठी महामार्गावरून ट्रक धावत आहे. अन्नधान्य, भाजीपाला, फळे, औषधे आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक अविरतपण होत आहे. अनेक दिवस घराच्या बाहेर राहून सामानाची पोहच दूरवर अंतरावर करणारे ट्रकचालक खरोखरच भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे.
चंदन मोटघरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : लॉकडाऊनमुळे हॉटेल, धाबे बंद असल्याने जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांची आबळ होत होती. हजारो किलोमीटरचा प्रवास करताना भोजनासह विविध सुविधांचा अभाव होता. ही अडचण ओळखून लाखनी येथे अशोका बिल्डकॉन कंनीने विश्रांतीसाठी जनसुविधा तयार केली. तेथे येणाऱ्या वाहनचालकांना लाखनीवासीयांतर्फे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे या वाहन चालकांना मोठा आधार मिळाला आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर लाखनी हे तालुक्याचे ठिकाण आहे. भंडारा जिल्ह्यातील ट्रांसपोर्टनगरी म्हणून लाखनीचा उल्लेख केला जातो. शहर व मानेगाव या दरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अशोका बिल्डकॉन कंपनी करत आहे. मात्र आता लॉकडाऊनने सर्व ठप्प आहे. परंतु लोकांच्या गरजा भागविण्यासाठी महामार्गावरून ट्रक धावत आहे. अन्नधान्य, भाजीपाला, फळे, औषधे आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक अविरतपण होत आहे. अनेक दिवस घराच्या बाहेर राहून सामानाची पोहच दूरवर अंतरावर करणारे ट्रकचालक खरोखरच भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. अनेक दिवस आपल्या कुटुंबापासून दूर राहून ट्रक चालक एकप्रकारे जनतेची सेवा करीत आहेत. स्थानिक राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ जुना क्रमांक हा १९४९ किलोमीटर अंतराचा आहे. याला एशियन हायवे ४६, मुंबई कलकत्ता हायवे, ग्रॅन्ट इस्टर्न हायवे म्हणून ओळखला जातो. राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ हा गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओरिसा, झारखंड, पश्चिम बंगालपर्यंत सहा राज्यातून जात असतो. हा महामार्ग धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा या शहरातून जात असतो. सदर महामार्गावरून औषधे, मत्स्यबिज, भाजीपाला, फळे व इतर वस्तूची वाहतूक २४ तास सुरु असते. लाखनी येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर भंडारापासून ते मुंडीपार (सडक) पर्यंत ढाबे आहेत. त्याठिकाणी ट्रकचालक वाहने थांबवून जेवण करून आराम करायचे व पुढच्या प्रवासाला निघायचे. लॉकडाउनमुळे धाबे, हॉटेल बंद आहेत. त्यामुळे ट्रकचालकाची आबाळ होत आहे. अनेक ट्रकचालक स्वत: स्वयंपाक करून भोजन करतात. त्याकरिता लाखनी नजीकच्या जनसुविधेचा आधार घेतात.
एक दिवा त्यांच्यासाठी
लॉकडाऊनच्या परिस्थितीत महामार्गावर वाहनांची संख्या कमी आहे. काही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाºया ट्रकला परवानगी दिली जात आहे. तर काही ठिकाणी ट्रक थांबलेली दिसून येत आहेत. आपल्या घरादारापासून दूर राहून हजारो किमी अंतराचा प्रवास करून माल पोहचविणाºया ट्रकचालकांचे आपल्या दळणवळण व्यवस्थेत महत्वाचे योगदान आहे. म्हणून एक दिवा त्यांच्यासाठी ही पेटवला जावा.