लाखनी तालुक्यात १६९१ मतदारांचे यादीत छायाचित्रच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:31 AM2021-03-22T04:31:47+5:302021-03-22T04:31:47+5:30
लाखनी : तालुक्यात मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू असून, १६९१ मतदारांचे मतदार यादीत छायचित्र नसल्याचे पुढे आले आहे. ...
लाखनी : तालुक्यात मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू असून, १६९१ मतदारांचे मतदार यादीत छायचित्र नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे अशा मतदारांचे छायचित्र प्राप्त करून स्थंलातरित मतदारांचे नमुना ७ भरुन घेण्याचे निर्देश तहसीलदार मल्लिक विरानी यांनी दिले.
येथील तहसील कार्यलयात बीएलओ, आशा व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शन सभेत ते बोलत होते. या सभेत तहसीलदार विरानी यांनी दुबार मतदार व मृत मतदारांचे नमुना ७ भरून घेण्याची कार्यवाही २५ मार्चपर्यंत करण्याचे आवाहन केले आहे. मतदार याद्या बीएलओ, तलाठ्यांजवळ उपलब्ध आहेत तसेच तहसील कार्यालयातही उपलब्ध आहेत. दुबार मतदारांनी स्वतःहून नमुने ७ भरून नाव कमी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मृत मतदारांच्या कुटुंबियांनी मृत्यू प्रमाणपत्र सादर करून मृत मतदारांचे यादीमधून नाव कमी करण्याचे आवाहनही केले आहे.
लाखनी तालुक्यात मतदार यादीत छायाचित्र नसलेले १ हजार ६९१ मतदार आहेत. अद्यापपर्यंत ७१ मतदारांचे छायाचित्र जमा झाले आहे. नमुने सात भरलेल्या मृत मतदारांची संख्या १४२ आहे. स्थलांतरित मतदार ६८१ आहेत. अशा एकूण ८२३ मतदारांपैकी ३११ व्यक्तिंची माहिती संगणकीकृत झाली आहे. राज्याचे मुख्य निर्वाचन अधिकाऱ्यांनी १५ जानेवारी रोजी प्रकाशित होणाऱ्या विधानसभा मतदार यादीमध्ये १०० टक्के मतदार याद्या छायाचित्रासह व कोणत्याही त्रुटीशिवाय तयार करण्याचे आदेश दिले आहेत.