लाखनीत दूरभाष केंद्राची धुरा कंत्राटी कामगारांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 05:00 AM2020-08-28T05:00:00+5:302020-08-28T05:00:48+5:30
सर्वसामान्य दूरध्वनी ग्राहक मोबाईल फोनमुळे बीएसएनएलचे हिरावले गेले असले तरी भारत सरकारच्या उपक्रम असलेली बीएसएनएलचे महत्व अद्यापही कायम आहे. लाखनी तालुक्याच्या दूरभाष केंद्राची जबाबदारी कंत्राटी कामगार राजेंद्र तुमसरे यांच्यावर आहे. तालुक्यातील लाखनी सोबत पालांदूर चौरास, मुरमाडी (तुपकर), पोहरा येथील केंद्राची जबाबदारी कंत्राटी कामगार तुमसरे यांच्यावर आहे.
चंदन मोटघरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : तालुक्यातील बीएसएनएल दुरभाष केंद्राची धुरा कंत्राटी कामगाराच्या खांद्यावर दिलेली आहे. बीएसएनएलने कर्मचारी कपात केली. नवीन पद भरलेली नाही. यामुळे कंत्राटी कामगारांना दुरभाष केंद्राची जबाबदारी सांभाळावी लागत आहे.
सर्वसामान्य दूरध्वनी ग्राहक मोबाईल फोनमुळे बीएसएनएलचे हिरावले गेले असले तरी भारत सरकारच्या उपक्रम असलेली बीएसएनएलचे महत्व अद्यापही कायम आहे. लाखनी तालुक्याच्या दूरभाष केंद्राची जबाबदारी कंत्राटी कामगार राजेंद्र तुमसरे यांच्यावर आहे. तालुक्यातील लाखनी सोबत पालांदूर चौरास, मुरमाडी (तुपकर), पोहरा येथील केंद्राची जबाबदारी कंत्राटी कामगार तुमसरे यांच्यावर आहे. त्यांना तांत्रिक व इतर मदतीसाठी एकही मजूर सहकारी दिलेला नाही. त्यामुळे एका कामगारावर कारभार चालविला जात आहे. बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांची कपात झालेली आहेत. बीएसएनएलचे उपविभागीय अधिकारी प्रविणसिंग परिहार यांच्याकडे लाखनीसह मोरगाव/ अर्जुनी, पवनी, लाखांदूर, साकोली, देवरी येथील काम आहे. कनिष्ठ अभियंता संजय वलथरे यांच्याकडे लाखनी, साकोलीचा प्रभार आहे. शासनाची बीएसएनएल अद्यापही जनतेला कार्यक्षमतेने सेवा देत आहे.
लाखनी तालुक्यात १५० दूरध्वनी ग्राहक
तालुक्यात १५० दुरध्वनी कनेक्शन आहेत. यात वैयक्तिक ग्राहक, बँका, शासकीय झाल्यानंतर दूरध्वनी कनेक्शन मध्ये अनेक समस्या आहेत. बँकासाठी बीएसएनएलने लीज लाईन दिलेली आहे. एलआयसीला स्वतंत्र लाईन आहे. इंटरनेट बँकींगसाठी बीएसएनएलचा वापर केला जातो. रस्त्याचे रुंदीकरण झाल्यानंतर रस्त्याच्या आतमध्ये असलेली वायरलाईन खांबावरुन देण्यात आली आहे. लाखनी येथे बीएसएनएलचे तीन टॉवर आहेत. तांत्रिक दुरुस्ती, समस्या निराकरण, ग्राहकांच्या तक्रारी व सातत्याने इंटरनेट सेवा ही सर्व एका कंत्राटी कामगाराला पार पाडावी लागतात.