लालपरी थांबल्याने एक कोटी ३८ लाखांचा बुडाला महसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 05:00 AM2020-04-15T05:00:00+5:302020-04-15T05:01:40+5:30
ग्रामीण शहरी सर्वसामान्य नागरिकांची लालपरी गत २३ दिवसांपासून जागीच थांबली आहे. कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून २३ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे सर्व बसगाड्या आगारात उभ्या आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतरच एसटी पुन्हा रस्त्यावर धावू लागतील. केवळ अत्यावश्यक कामानिमित्त कर्मचाऱ्यांना बोलाविण्यात येते. नेहमी प्रवाशांनी गजबजलेला बसस्थानकात स्मशान शांतता पसरली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : लॉकडाऊन काळात गत २३ दिवसांपासून एसटीची चाके थांबली आहेत. तुमसर आगाराचा एक कोटी ३८ लाखांचा महसूल बुडाला आहे. भंडारा जिल्ह्यात तुमसर आगार महसूल मिळवून देणारा दुसऱ्या क्रमांकाचा आगार आहे. सदर आगारात ७० बसगाड्या असून दररोज २१ हजार किमीचा प्रवास करतात.
ग्रामीण शहरी सर्वसामान्य नागरिकांची लालपरी गत २३ दिवसांपासून जागीच थांबली आहे. कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून २३ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे सर्व बसगाड्या आगारात उभ्या आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतरच एसटी पुन्हा रस्त्यावर धावू लागतील. केवळ अत्यावश्यक कामानिमित्त कर्मचाऱ्यांना बोलाविण्यात येते. नेहमी प्रवाशांनी गजबजलेला बसस्थानकात स्मशान शांतता पसरली आहे.
एसटी महामंडळाच्या इतिहासात प्रथमच इतके दिवस बसगाड्या उभ्या आहेत. तुमसर आगारातून लांब पल्ल्याच्या बसगाड्या अकोला, राजूरा, परतवाडा, माहूर येथे दररोज फेºया आहेत. सुरक्षित प्रवासाकरीता प्रवाशांची एसटीलाच प्रथम प्राधान्य देतात.
तुमसर आगारात एकूण ७० बसगाड्यांचा समावेश आहे. दरदिवशी सहा लाखांचे उत्पन्न येथे एसटीला मिळतो. २३ दिवसोचे सुमारे एक कोटी ३८ लाख रुपयांच्या महसूलाला महामंडळाला मुकावे लागले. तीन मे पर्यंत लॉकडाऊन असल्याने पुन्हा एसटीला थांबण्याशिवाय पर्याय उपलब्ध नाही. गाव खेड्यात प्रवासाचे एकमेव साधन एसटी बंद पडली आहे.
एसटी गाड्या कायम एकाच जागेवर उभ्या असल्याने लॉकडाऊनपुर्वी त्यांचे मेन्टेन्स महामंडळाला करणे आवश्यक आहे. संचारबंदीनंतर एसटी पूर्ववत रस्त्यावर धावण्याची प्रतीक्षा येथे सर्वसामान्यांना आहे.
तुमसर आगार लॉकडाऊनने बंद असून दरदिवशी सुमारे सहा लाखांचे उत्पन्न होते. गत २३ दिवसांपासून एसटी आगारात उभ्या आहेत. कोरोनाचा हा फटका आहे.
-युधिष्ठीर रामचौरे, आगारप्रमुख, तुमसर.