विद्यार्थ्यांसाठी लालपरी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 05:00 AM2020-11-22T05:00:00+5:302020-11-22T05:00:28+5:30
मानव विकास कार्यक्रम अंतर्गत वर्ग ९ ते १२ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत बस वाहतूक सुविधा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. शैक्षणिक सत्र यावर्षी कोरोना संकटात सुरु झाले नाही. परंतु २३ नोव्हेंबरपासून आता शाळा सुरु करण्याच्या निर्णय शासनाने घेतला आहे. यात तुमसर - हरदोली, दावेझरी टोला, तुमसर - गोबरवाही, तुमसर - ताडगाव, तुमसर- नाकाडोंगरी, तुमसर - रोंघा, मंगरली, तुमसर - लेंडेझरी व तुमसर - लोभी या मार्गावर पूर्ववत बसगाड्या सुरु रण्यात येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : शाळेची पहिली घंटा २३ नोव्हेंबरपासून वाजणार आहे. शाळेत विद्यार्थी यावेत, याकरीता मानव विकास कार्यक्रमांतर्गत सोमवार ते शुक्रवार दरम्यान बसगाड्या तुमसर तालुक्यातील सात वाहतूक मार्गावर धावणार आहे. शिक्षण विभागाने एस. टी. महामंडळाला शालेय वेळेत सदर बसगाड्या सुरु करण्यासंदर्भात कळविले आहे.
मानव विकास कार्यक्रम अंतर्गत वर्ग ९ ते १२ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत बस वाहतूक सुविधा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. शैक्षणिक सत्र यावर्षी कोरोना संकटात सुरु झाले नाही. परंतु २३ नोव्हेंबरपासून आता शाळा सुरु करण्याच्या निर्णय शासनाने घेतला आहे.
यात तुमसर - हरदोली, दावेझरी टोला, तुमसर - गोबरवाही, तुमसर - ताडगाव, तुमसर- नाकाडोंगरी, तुमसर - रोंघा, मंगरली, तुमसर - लेंडेझरी व तुमसर - लोभी या मार्गावर पूर्ववत बसगाड्या सुरु रण्यात येत आहेत. सोमवार ते शुक्रवार शाळेची वेळ ही सकाळी ११ ते दुपारी ३ व शनिवारी सकाळी ७.३० ते ११.३० अशी आहे. बसस्थानकामधून दुपारच्या शाळेला सकाळी ९ वाजता व विद्यार्थीनींना शाळेतून परत घरी येण्याकरीता बसस्थानकातून बस सकाळी ७ वाजता सुटेल व शाळेतून घरी येण्याकरिता बस बसस्थानकातून सकाळी ११ वाजता निघण्याची सुविधा आहे. खंडविकास अधिकाऱ्यांनी एसटी महामंडळाला तशा सुचना दिल्या आहेत.
आरटीपीसीआर अहवालाची प्रतीक्षा
शिक्षकांनी स्वत:ची आरटीपीसीाअर चाचणी उपजिल्हा तथा इतर रुग्णालयात केल्या. केवळ उद्याचा दिवस शिल्लक असताना आरटीपीसीआर अहवाल प्राप्त झाला नाही. सोमवारी सदर अहवाल येण्याची प्रतीक्षा आहे. शाळांचे निर्जंतुकीकरण सध्या सुरु आहे.
पालकांचे संमतीपत्र आवश्यक
शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनी पालकांकडून पहिल्यांच दिवशी संमती पत्र आणणे आवश्यक आहे. येथे पालकांना स्वत:च्या जबाबदारीवर पाल्याला पाठवायचे आहे. त्यामुळे पालकांत संभ्रम निर्माण झाला आहे.