लालपरीप्रमाणेच शिवशाहीलाही आतापर्यंत अत्यल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:42 AM2021-09-07T04:42:19+5:302021-09-07T04:42:19+5:30

भंडारा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस प्रवाशांच्या भरवशाची लालपरी सध्या प्रवासी प्रतिसादाअभावी मोजक्याच प्रवाशांना घेऊन धावत असल्याने संकटात ...

Like Lalpari, Shivshahi has received very little response so far | लालपरीप्रमाणेच शिवशाहीलाही आतापर्यंत अत्यल्प प्रतिसाद

लालपरीप्रमाणेच शिवशाहीलाही आतापर्यंत अत्यल्प प्रतिसाद

Next

भंडारा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस प्रवाशांच्या भरवशाची लालपरी सध्या प्रवासी प्रतिसादाअभावी मोजक्याच प्रवाशांना घेऊन धावत असल्याने संकटात आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने केलेला कहर आजही नागरिकांना प्रवासासाठी धजावू देत नसल्याने एसटीला अडचणीचे दिवस बघावे लागत आहे. ही बाब फक्त लालपरीसाठीच लागू नसून शिवशाहीसुद्धा संकटांचा सामना करीत आहे. जिल्ह्यात भंडारा, तुमसर, साकोली व पवनी असे चार आगार आहेत. भंडारा आगाराला १६, तुमसरला ५, साकोलीला एक शिवशाही देण्यात आल्या आहेत. यातील एक शिवशाही राखीव ठेवण्यात आली आहे. १५ शिवशाही सध्या प्रवासी सेवेत आहे. मात्र प्रवासी प्रतिसाद नसल्याने ही शिवशाही मोजकेच प्रवासी घेऊन जाताना दिसून येत आहे.

बसेसचे दररोज सॅनिटायझेशन

कोरोनाचा प्रादुर्भाव बघता बसेसचे दररोज सॅनिटायझेशन करण्याचे आदेश राज्य रस्ते परिवहन महामंडळाकडून आगारांना देण्यात आले आहे. त्यानुसार, आगारांमधून बस सुटण्यापूर्वी तिचे सॅनिटायझेशन केले जाते. तसेच बस आगारात आली की तिचे सॅनिटायझेशन केले जाते. महामंडळाकडून प्रवासी सुविधेला प्राधान्य दिले जात असल्याने बसेसच्या सॅनिटायझेशनवर जास्त भर दिला जात आहे. यासाठी विभागीय कार्यालयाकडून आगारांना सर्व साहित्य पुरविले जात आहे. विशेष म्हणजे, आता सॅनिटायझेशनपासून सुटका व्हावी यासाठी बसेसला विशेष कोटिंग केले जाणार आहे.

सर्वच बसेसला मोजका प्रतिसाद

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र कहर केला व त्याचे परिणाम जिल्ह्यातही गंभीर दिसून आले. यामुळे प्रवासाला घेऊन नागरिक आजही सचेत असून, प्रवासी वाहनांतून प्रवास टाळत खासगी वाहनांना प्राथमिकता देत आहेत. यामुळे सर्वच बसेसला मोजकाच प्रवासी प्रतिसाद दिसून येत आहे.

-फाल्गुन राखडे, वाहतूक निरीक्षक, भंडारा आगार

Web Title: Like Lalpari, Shivshahi has received very little response so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.