सालेबर्डी प्रकल्पग्रस्तांना भूखंडाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:03 AM2018-04-10T00:03:08+5:302018-04-10T00:03:08+5:30

भंडारा तालुक्यातील सालेबर्डी (पांधी) हे गाव गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात संपादीत करण्यात आले आहे. या गावाचे नियोजित पुनर्वसन शहापूर/मारेगाव या ठिकाणी करण्याचे नियोजन आहे. सदर पुनर्वसन स्थळी १८ नागरी सुविधेची कामे युद्धपातळीवर एनबीसीसी कंपनीतर्फे सुरु आहेत.

Land allotment to Saleburdy project affected | सालेबर्डी प्रकल्पग्रस्तांना भूखंडाचे वाटप

सालेबर्डी प्रकल्पग्रस्तांना भूखंडाचे वाटप

Next
ठळक मुद्देईश्वरचिठ्ठीचा आधार : अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : भंडारा तालुक्यातील सालेबर्डी (पांधी) हे गाव गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात संपादीत करण्यात आले आहे. या गावाचे नियोजित पुनर्वसन शहापूर/मारेगाव या ठिकाणी करण्याचे नियोजन आहे. सदर पुनर्वसन स्थळी १८ नागरी सुविधेची कामे युद्धपातळीवर एनबीसीसी कंपनीतर्फे सुरु आहेत. अशातच गेल्या फेब्रुवारी महिन्यात ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी जिल्हाधिकाºयांची प्रत्यक्ष भेट घेऊन भूखंड मिळण्यासाठी चर्चा करण्यात आली. यावर जिल्हाधिकाºयांनी संबंधित यंत्रणेला भूखंडाचे वाटप करण्यासाठी निर्देश दिले होते.
या भूखंड वाटपाच्या कार्यक्रमात ईश्वर चिठ्ठीने भूखंडाचे क्रमांक पाडण्यात आले. त्यामध्ये ५५५ चौ.मी. चे ४८, ३७० चौ.मी. ११८, २७८ चौ.मी. २७, १८५ चौ.मी. ११३ अशाप्रकारे सालेबर्डी प्रकल्पग्रस्तांना ईश्वरचिठ्ठीने दिव्यानी ठवकर या बालिकेच्या हस्ते काढण्यात आले. अशा प्रकल्पग्रस्तांना या भूखंड वाटपाची प्रक्रिया नायब तहसीलदार एम. यु. वाकलेकर, परिक्षाविधी नायब तहसीलदार एस. जे. मोरे, शहापूरचे मंडळ अधिकारी जयंत सोनवाने, ग्रामसेवक एस. के. गायधने, तलाठी त्रिभुवन, तलाठी निमजे शहापूर, प्रविण जगताप तलाठी परसोडी, कनिष्ठ लिपीक तहसील सतदेवे आदीनी भूखंड वाटपाची प्रक्रिया पार पाडली. यावेळी सरपंचा जिजा मेश्राम, पोलीस पाटील हिरालाल पुडके, तंमुस अध्यक्ष टोमदेव तितीरमारे, ग्रा.पं. सदस्यगण, यशंवत टिचकुले आदीे उपस्थित होते

Web Title: Land allotment to Saleburdy project affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.