ओलीत जमीन झाली बिगरओलीत

By admin | Published: May 26, 2016 01:38 AM2016-05-26T01:38:48+5:302016-05-26T01:38:48+5:30

अडयाळ येथील श्रीकृष्ण सखाराम कुंभलकर भूमापन क्रमांक ५६० खाते क्रमांक १२७ व एकून जमीन १.४८ हेक्टर आर. असून

The land came from Biggeroli | ओलीत जमीन झाली बिगरओलीत

ओलीत जमीन झाली बिगरओलीत

Next

चौकशीची मागणी : प्रकरण अड्याळ तलाठी साझा क्रमांक २ मधील
अड्याळ : अडयाळ येथील श्रीकृष्ण सखाराम कुंभलकर भूमापन क्रमांक ५६० खाते क्रमांक १२७ व एकून जमीन १.४८ हेक्टर आर. असून या जमीनीला क्रमांक १४४२ च्या तलावाचे पाणी लागू असल्याचे स्पष्ट लिहले आहे. महत्वाचे म्हणजे सन २०१४-१५ पर्यंत जमीन ओलीत असल्याचा सातबारा ही तलाठी कार्यालयातून मिळत असे परंतु यावर्षी हा सातबारा ओलीताचा न मिळता बिगरओलिताचा मिळाल्याने या शेतकऱ्यांला जबर धक्काच बसला आहे.
भारतातील ब्रिटीश राजवटीत १८१४ सालच्या अधिनियमानुसार ग्रामीण भागातले सरकारी हिशोब व दप्तर सांभाळण्यासाठी तलाठी (पटवारी) या पदाची निर्मीती केली गेली. १९१८ साली महाराष्ट्रातील ‘वतने’ समाप्त केल्या गेली. पगारी तत्वावर तलाठी पदे सुरु झाली. ग्रामीण भागाच्या नोंदवह्या अद्यावत ठेवणे, दैनंदिन कार्यावर लक्ष ठेवणे, गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेणे, सरकार व जनता या मधील कष्टाचे काम करणे, नैसर्गिक आपत्तीची माहिती मंडळ अधिकारी व तहसीलदारास देणे, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम १५४ नुसार नोंद करणाऱ्याने किंवा जिल्हाधिकारी यांनी कळविलेले संपादन यांचे नोंदवहीत विवरण होणे असे अनेक महत्वाचे कर्तव्य तलाठीला लागु आहेत.
तलाठी कार्यालयात होणारा अनधिकृत काम म्हणजे ज्यांची शेतजमीन ओलीत आहे तिला बिगरओलीत करणे आणि ज्यांची बिगर ओलीत आहे तिला चिरीमीरी देऊ न तिला ओलीत एकंदरीत काळा कारभार झाल्याचे समजते. तत्कालीन कर्मचाऱ्यांच्या काळातच हा सर्व गैरप्रकार झाल्याचे बोलले जात आहे. जमीन ओलीताची बिगरओलीत करण्याचा अधिकार कोणाला आहे आणि कोणतया कारणास्तव हा कारभार करण्यात आला. एकंदरीत या अशा कारभारामुळेच की काय लोकांचा शेतकऱ्यांचा मन:स्ताप वाढत आहे. याकडे विशेष चौकशी समिती नेमून या प्रकरणाची खोलवर चौकशी व्हावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाही व्हावी यासाठी जिल्हाधिकारी यांनी याकडे विशेष लक्ष घालावे अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)

Web Title: The land came from Biggeroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.