भूमी अभिलेख परिनिरीक्षकाला अटक

By admin | Published: June 7, 2015 12:44 AM2015-06-07T00:44:19+5:302015-06-07T00:44:19+5:30

जमिनीच्या नकाशात फेरबदल करून न्यायालयाची दिशाभूल करण्याच्या प्रकरणात भूमी अभिलेख विभागाचे ..

Land Records Observer arrested | भूमी अभिलेख परिनिरीक्षकाला अटक

भूमी अभिलेख परिनिरीक्षकाला अटक

Next

चार आरोपींची जमानत रद्द : जमिनीच्या नकाशात खोडतोड करून फेरबदल
गोंदिया : जमिनीच्या नकाशात फेरबदल करून न्यायालयाची दिशाभूल करण्याच्या प्रकरणात भूमी अभिलेख विभागाचे परिनिरीक्षक ललितकुमार बहेकार (४९) याला शहर पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात सादर केल्यावर ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणात न्यायालयाने आधीच चार जणांचे जमानत अर्ज रद्द केले आहेत. या प्रकरणात अनेक जणांचे चेहरे उघड होतील व नगर परिषदेचे काही अधिकारीसुद्धा यात अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सिव्हील लाईन्स गोंदिया येथील रहिवासी वसंत ठाकूर यांनी न्यायालयात एक प्रकरण दाखल केले आहे. याच आधारावर न्यायालयाने फौजदारी संहितेच्या कलम १५६ (३) अन्वये प्रकरण दाखल करण्याचे आदेश शहर पोलिसांना दिले होते. सदर प्रकरणाच्या तपासणी दरम्यान अर्जदार चंदन भौमिक यांनी गोंदिया नजूल शीट-४९ (क) प्लॉट-१६७ च्या उपहिस्याची गणना करण्यासाठी अर्ज केल्यावर जमीन मोजमाप करण्यात आली. यात क्रमांक-२ वर उपहिस्सा कामय करण्यात आले नाही, असे मत नोंदवून चंदन भौमिक यांना मोजमापची ‘क’ प्रती ३० जुलै २०१३ रोजी उपलब्ध करविण्यात आली.
या प्रतच्या आधारावर भौमिक यांनी नगर परिषदेला सदर ठिकाणी बांधकाम करण्याची परवानगी मागितली. नगर परिषदेने एका पत्रात मोजमाप क्रमांक २३/१३ मध्ये हिस्से-वाटप पत्रानुसार उपहिस्सा कायम करून दाखविण्यात यावे, असे म्हटले. यानंतर भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी आधी दिलेल्या प्रतीवर व्हाईटनर लावून ‘उपहिस्सा कायम केलेला आहे’ असे मत नोंदवून त्याची ‘क’ प्रतीसुद्धा उपलब्ध करून दिली. या आधारावर ३० आॅक्टोबर २०१४ रोजी चंदन भौमिक यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट पिटिशन क्रमांक ५९२७/१४ दाखल केला. यात त्यांनी सीमा कायम करण्यात आलेला नकाशा सादर केला.
तो नकाशा बनावटी व खोडतोड करून बनविला आहे. एवढेच नव्हे तर न्यायालयासमोर बनावटी स्वाक्षरी करून सादर करण्यात आले. ही बाब पोलीस तपासात स्पष्ट झाली आहे.
उल्लेखनिय म्हणजे सदर प्रकरणाची तपासणी करीत असलेले सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांनी न्यायालयाला सांगितले की, नगर परिषदेकडून सीमा नोंद करवून आणण्याची सूचना अर्जदाराला देण्यात आली होती. यानंतर बंद करण्यात आलेले मोजमाप क्रमांक २३/१३ च्या प्रकरणाला भूमी अभिलेख विभागाच्या रेकार्ड रूममधून शासकीय कर्मचाऱ्यानेच बाहेर काढले असावे, ही बाब पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आली.
भूमी अभिलेख विभागाचे तत्कालीन उपअधीक्षक टी.एल. गिडमणी यांनी बहेकार याला आपल्या कक्षात बोलावून भौमिक यांना दिलेली ‘क’ प्रती चुकीची आहे व त्यांना सुधारित प्रती देण्यात यावे, असे निर्देश देण्यात आल्याची माहिती बहेकार यांनी आपल्या खुलाशात पोलीस विभागासमोर स्वीकार केली.
या प्रकरणात भूमी अभिलेख विभागाचे प्रभारी अधिकारी नरेश रंगारी, नजूल परिरक्षक भूमापक गुलाब निर्वाण, तत्कालीन उपअधीक्षक टी.एल. गिडमणी व चंदन भौमिक यांना सत्र न्यायालयाने अटकपूर्व जमानत देण्याचे नाकारले. रंगारी, निर्वाण व भौमिक यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जमानतसाठी अर्ज केले असल्याची माहिती आहे.
बहेकारला अटक करण्यात आली आहे व सध्या तो नगर भूमापक लिपिक पदावर कार्यरत आहे. वादग्रस्त मोजपाम दरम्यानसुद्धा ते याच पदावर कार्यरत होते व वादग्रस्त ‘क’ प्रतीवर त्यांची स्वाक्षरी आहे.
बालाघाट मार्गावरील एका जमिनीच्या मोजमापात करण्यात आलेली ही गडबड भविष्यात नगर परिषदेच्या यात लिप्त काही अधिकाऱ्यांनाही उघड करेल, अशी चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Land Records Observer arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.