भूमिअभिलेख कार्यालय पाच महिन्यांपासून अंधारात
By admin | Published: June 1, 2016 01:50 AM2016-06-01T01:50:28+5:302016-06-01T01:50:28+5:30
प्रमुख अधिकाऱ्याच्या पदावर प्रभारी अधिकाऱ्याची पाच वर्षापासून नियुक्ती असल्याने शासकीय कामे व कार्यालयाची कशी वाताहत होते
पाच वर्षांपासून प्रभारी अधिकारी : वीज बिल न भरल्याने कामे खोळंबली
लाखांदूर : प्रमुख अधिकाऱ्याच्या पदावर प्रभारी अधिकाऱ्याची पाच वर्षापासून नियुक्ती असल्याने शासकीय कामे व कार्यालयाची कशी वाताहत होते याचे उत्तम उदाहरण येथील भूमिअभिलेख कार्यालयात तालुक्यातील नागरिकांना पाच वषार्पासून बघायला मिळत आहे. वीज पुरवठा खंडीत, पाण्याची समस्या यामुळे कर्मचाऱ्यांची काम करण्याची मानसिकता नसल्याने कामे खोळंबली आहेत.
तालुक्याच्या ठिकाणी नागरिक व शेतकऱ्यांची कामे वेळेवर व्हावी, यासाठी उघडण्यात आली. या कार्यालयाअंतर्गत ६३ ग्रामपंचायत व ७९ गावाचा कारभार चालतो. शेतकऱ्यांचे शेती व जमिनीसंदर्भात महत्त्वाचे दस्ताऐवज या कार्यालयात राखून ठेवले जातात. शासनाच्या नविन धोरणानुसार आता शेतकऱ्यांना आनलाईन दस्ताऐवज मिळणे सुरू झाले. महत्त्वाच्या कार्यालयाच्या यादीत हे कार्यालय महत्त्वाची भुमीका बजावत असताना प्रशासन व अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे हे कार्यालय बेभरवशाचे झाले आहे.
मागील पाच वषार्पासून या कार्यालयात प्रभारी मुख्य अधिकारी म्हणुन नियुक्ती असल्याने. कर्मचाऱ्यावर वचक राहिला नाही. मागील पाच महिण्यांपासून वीज बिल न भरल्याने विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला. संपुर्ण उन्हाळ्यात येथील कर्मचारी उष्णता अंगावर झेलुन काम करताना दिसत होते. मात्र मानसिकता बिघडत असल्याने कर्मचारी कामे टाकून कार्यालयाबाहेर पडून थंडाव्याच्या शोधात फिरताना दिसतात.
विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने सर्व आनलाईन कामे मागील पाच महिण्यापासून बंद आहे. येथील कर्मचाऱ्यांची मानसिकता खराब झाल्याने कार्यालयीन कामासाठी आलेल्या शेतकरी व नागरिकावर येथील काही कर्मचारी कामे करुन न देता अर्वाच्च शब्दात बोलुन हाकलुन लावल्याचा प्रकार येथील अर्जनविस दररोजच अनुभवतात. त्यामुळे लवकरात लवकर विद्युत पुरवठा सुरू करून न शासकीय कामे नियमित सुरु करण्याची तसेच कायमस्वरूपी मुख्य अधिकाऱ्याची नियुक्तीची मागणी नगरपंचायस्त सदस्य प्रल्हाद देशमुख यानी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)