भूस्खलनाने शेकडो एकर शेती गिळंकृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2022 05:00 AM2022-07-18T05:00:00+5:302022-07-18T05:00:20+5:30

तुमसर तालुक्यातून वैनगंगा नदी वाहते. सुमारे ३९ ते ३५ किलोमीटरचा प्रवास वैनगंगा नदी तालुक्यातून करते. नदीकाठावरील रेंगे पार, उमरवाडा, बोरी, कोष्टी, बाम्हनी, चारगाव, ढोरवाडा, सुकडी(दे.) व इतर नदीकाठाच्या कडा मोठ्या प्रमाणात भूस्खलन होत आहे. काठावरील सुपीक व गाळाची शेती नदीपात्रात समाविष्ट होत आहे. अनेक शेतकरी भूमिहीन झाले आहेत. शासनाने त्यांना अजूनपर्यंत कोणताही मोबदला दिला नाही.

Landslides engulfed hundreds of acres of agriculture | भूस्खलनाने शेकडो एकर शेती गिळंकृत

भूस्खलनाने शेकडो एकर शेती गिळंकृत

Next

मोहन भोयर
लाेकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तालुक्यातील जीवनदायी वैनगंगा नदीने काठावरील शेकडो एकर सुपीक व गाळाची जमीन गिळंकृत केली आहे. परंतु शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळाला नसून शासनाने अजूनपर्यंत येथे कोणतीही उपाययोजना केली नाही. येणाऱ्या काळात नदीकाठावरील शेतजमिनीसह गावांनाही धोका येथे उत्पन्न झाला आहे.
तुमसर तालुक्यातून वैनगंगा नदी वाहते. सुमारे ३९ ते ३५ किलोमीटरचा प्रवास वैनगंगा नदी तालुक्यातून करते. नदीकाठावरील रेंगे पार, उमरवाडा, बोरी, कोष्टी, बाम्हनी, चारगाव, ढोरवाडा, सुकडी(दे.) व इतर नदीकाठाच्या कडा मोठ्या प्रमाणात भूस्खलन होत आहे. काठावरील सुपीक व गाळाची शेती नदीपात्रात समाविष्ट होत आहे. अनेक शेतकरी भूमिहीन झाले आहेत. शासनाने त्यांना अजूनपर्यंत कोणताही मोबदला दिला नाही. अनेक शेतकऱ्यांना आता मजुरी करावी लागत आहे. कुटुंबाचे पालनपोषण कसे करावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.
४२ हेक्टर शेतजमीन नदीपात्रात गेल्याची नोंद : शासनदप्तरी वैनगंगा नदीपात्रात आतापर्यंत केवळ ४२ हेक्टर शेतजमीन नदीपात्रात समाविष्ट झाल्याची नोंद आहे. तुमसर तालुक्यातील नदीकाठावरील अनेक गावांना याचा फटका बसत आहे. शेतजमीन ही बागायती शेती आहे. लाखो रुपयांची शेती येथे नदीपात्रात समाविष्ट होतानी येथील शेतकरी डोळ्यांने बघतात. 

सुरक्षा भिंतीची गरज
- जिथे नदीने पात्र बदललेले आहे व मोठ्या प्रमाणात भूस्खलन होत आहे किमान त्या नदीकाठावर सुरक्षा भिंत बांधण्याची गरज आहे. नदीकाठावर मोठे दगड टाकून तेथे भिंत बांधल्यास भूस्खलनाच्या धोका कमी होऊन सुपीक व गाळाची शेतजमीन वाचवता येऊ शकते, परंतु त्यास राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.

रेतीउपशाचा परिणाम
- तुमसर तालुक्याच्या हद्दीतील वैनगंगा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात बेसुमार रेतीच्या उपसा मागील काही वर्षांपासून करण्यात येत आहे. त्यामुळे तुमसर तालुक्याच्या हद्दीतील नदीपात्र  खोल झाला आहे. तर पलीकडे तिरोडा तालुक्यातील नदीचे पात्र हे उंच आहे.  
-  ऐन पावसाळ्यात पूर आल्यानंतर पुराचे पाणी खोलगट भागातून तुमसर तालुक्याच्या हद्दीतून खळखळून वाहते. पाण्याच्या तेजप्रवाह काठावर आदळतो. नदीतील पाण्याचा प्रवाहाने पात्र बदलले काय, असे दृश्य या गावात दिसत आहे. एरवी सरळ वाहणारी नदी येथे काटकोनात वाहत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

 

Web Title: Landslides engulfed hundreds of acres of agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.