दुर्मीळ कलहंस बदकांचे मोठ्या प्रमाणात आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:05 AM2021-02-06T05:05:54+5:302021-02-06T05:05:54+5:30

ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह प्रा. अशोक गायधने, गुणवंत जिभकाटे, आदित्य शहारे, पंकज भिवगडे, संकल्प वैद्य, छविल रामटेके, प्रज्वल भांडारकर, अर्णव गायधने, ...

Large arrival of rare geese ducks | दुर्मीळ कलहंस बदकांचे मोठ्या प्रमाणात आगमन

दुर्मीळ कलहंस बदकांचे मोठ्या प्रमाणात आगमन

googlenewsNext

ग्रीनफ्रेंड्सचे कार्यवाह प्रा. अशोक गायधने, गुणवंत जिभकाटे, आदित्य शहारे, पंकज भिवगडे, संकल्प वैद्य, छविल रामटेके, प्रज्वल भांडारकर, अर्णव गायधने, दीप रामटेके, गौरेश निर्वाण, साहील निर्वाण, अमर रामटेके या ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब, अभा अंनिस व नेफडोच्या सदस्यांनी स्थलांतरित पक्षीगणनेत सहभाग नोंदविला. प्रा. गायधने यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुर्मीळ कलहंस बदकांचे आगमन विविध तलावांवर झाले आहे. लडाख, तिबेट, मंगोलिया, सैबेरिया प्रातांतून आलेले बदक रामपुरी, गुढरी, सिरेगाव, भूगाव, सोनमाळा, खुर्सिपार आदी तलावावर आढळत आहेत. यावर्षी खालोखाल आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेले हे मोठी लालसरी बदक अतिशय कमी प्रमाणात आढळले आहेत. साधी लालसरी, तलवार बदक, गारगेंनी, विगन बदक, गढवाल, धनवर बदक, हळदीकुंकू, अढई, अटला बदक, नकटा बदक नेहमीच्या प्रमाणात आढळले. स्थलांतरीत पक्ष्यांकरिता प्रसिद्ध असलेले लाखनी, साकोली, भंडारा तालुक्यातील विविध तलाव रावणवाडी, सिरेगाव, रेंगेपार कोठा, पूरकाबोडी, रेंगोळा, मांगलीबांध, शिवणीबांध, रेंगेपार कोहळी, सौन्दड या ठिकाणी भरपूर पाणी असूनसुद्धा पाणपक्षी फिरकले नाहीत किंवा तुरळक प्रमाणात फिरकले आहेत. शिवणीबांध, सिरेगावबांध व मांगलीबांध या ठिकाणी मासेमारीचा त्रास असल्याने पक्षी फिरकले नाहीत, अशी माहिती त्यांनी दिली. एकंदरीत यावर्षी तलावात भरपूर पाणी असतानासुद्धा स्थलांतरित पक्ष्यांचे प्रमाण कमी आढळत आहे. पक्षीगणनेचा अहवाल बीएनएचएस, मुंबई ई - बर्ड, महाराष्ट्र पक्षी संघटनेला पाठविण्यात आला.

Web Title: Large arrival of rare geese ducks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.