आठ महिन्यांत ३६ लाखचोर गजाआड
By Admin | Published: August 14, 2016 12:11 AM2016-08-14T00:11:01+5:302016-08-14T00:11:01+5:30
अलीकडच्या काळात राज्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चांगलीच कंबर कसली आहे.
लाचलुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई : शिक्षण विभागानंतर महसूल विभाग आघाडीवर, आठ शिक्षकांचाही समावेश
संजय साठवणे साकोली
अलीकडच्या काळात राज्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चांगलीच कंबर कसली आहे. याचा परिणाम भंडारा-गोंदिया लाचलुचपत प्रतिबंध विभागातून दिसून येत आहे. आजच्या घटकेला या दोन्ही जिल्ह्यांनी लक्षणीय कामगिरी केली असून या कामगिरीवर वरिष्ठ प्रशासन खुश असल्याची माहिती आहे. या विभागाने केवळ ८ महिन्यात २७ लाचखोर प्रकरणात ३६ भ्रष्ट शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना गजाआड केले. यानिमित्ताने शासकीय तिजोरीत लाखो रूपये जमा झाले आहेत.
भंडारा व गोंदिया दोन्ही जिल्ह्यातील विभागाने ३६ लाचखोर कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या असल्या तरी यात गोंदिया नागपूर विभाग आणि भंडारा गोंदिया विभागाची २ संयुक्त कार्यवाही वगळता भंडारा पथकाने १३ प्रकरणात २१ आरोपी तर गोंदिया पथकाने १२ प्रकरणात १३ लाचखोरांना पकडले. मे आणि जुन महिन्यात तब्बल सात सात आरोपीवर कार्यवाही करण्यात आली तर जुन महिन्यातील सात कर्मचारी हे फक्त शिक्षण विभागाचेच आहेत. शिवाय या ३६ आरोपीमध्ये चक्क ८ शिक्षकांचा समावेश आहे.
सण २०१६ या वर्षात प्रथम खाते उघडले ते गोंदिया एसीबीने १३ जानेवारी रोजी देवरी उपकोषागार कार्यालय अधिकारी दिनेश कुकडे याला १५ हजार रूपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. भंडारा विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रथम कारवाई केली ती २० जानेवारी रोजी भंडारा पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार अमोल तुळजेवार याने १ लक्ष ५० हजार रूपयांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. २५ जानेवारीला साकोली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सेंदुरवाफा ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य केशव निपाने याला ४ हजार पाचशे रूपये, ६ फेब्रुवारीला तुमसर येथे ईश्वरराव देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय नागपूरचे प्रा. राजेंद्र डहाळे आणि साकेत शारीरिक शिक्षण महाविद्यालय गोंदिया येथील प्रा. हितेश राठोड याला ३० हजार रूपये, १५ मार्चला तुमसर रोड देव्हाडी रेल्वे येथील सुरक्षा दल जवान याला १५ हजार, २७ एप्रिलला वनकार्यालय अड्याळ वा वनसंरक्षक रवी दहेकर याला १ हजार, ३ मे रोजी साकोली पंचायत समिती अंतर्गत पिटेझरी जि.प. प्राथमिक शाळा पिटेझरी येथील शिक्षक रमेश दुपारे याला १ हजार ५०० रूपये, १३ मे रोजी इंदोरा वाहतूक पोलीस प्रकाश राठोड याला १ हजार ५०० रूपयाची लाच घेताना स्विकारताना अटक करण्यात आली. १४ जुनला तिरोडा तालुका अंतर्गत कनिष्ठ महाविद्यालय ठाणेगाव येथील मुख्याध्यापक लिलाधर दुलीचंद बागडे आणि परिचर नंदकुमार सिडाम यांना ८ हजार रूपये, २० जुनला लाखांदूर तालुका अंतर्गत बेलाटी येथील चक्रधर स्वामी शिक्षण संस्था सचिव निश्चय दोनाडकर, अध्यक्ष दिपक दोनाडकर आणि मोहरणा येथील सदानंद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक केवळराम आकरे या तिघांना संयुक्तपणे ८० हजार रूपये, २४ जुनला सिहोरा येथील महाराष्ट्र हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथील सहायक शिक्षक सतीश बरडे याला १ हजार २०० रूपये आणि २६ जुलै रोजी पवनी तालुक्यात सापळा रचण्यात आला. यात वलणीचा संतोष गांडले, तहसील कार्यालयाचा कनिष्ठ लिपीक जयसिंग रावते आणि भंडारा पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई ज्ञानेशवर होके, मिलिंद कंधारे या चौघांना २ हजार ५०० रूपयांची लाच स्विकारताना पकडण्यात आले. आॅगस्ट महिन्यात साकोली येथील सहायक निबंधक बुरडे, कनिष्ठ लिपीक बहेकार यांनी पाच हजार रूपये मागितल्या प्रकरणी अटक करण्यात आली तर पवनी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी २५ हजाराची लाच मागितल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली. यात शिक्षण विभागाचे एकूण १०, महसूल विभागाचे ७, पोलीस विभागाचे ६, ग्रामपंचायत ४, वैद्यकीय विभाग १, वनविभाग ३ समाज कल्याण १, पाटबंधारे विभाग १ कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
१५ जानेवारीला सालेकसा तहसिल कार्यालयातील कनिष्ठ लिपीक सतीश चौधरी याला ३ हजार रूपये घेताना पकडण्यात आले. १८ जानेवारीला तिरोडा पंचायत समिती अंतर्गत इंदोरा खुर्द येथील ग्रामसेवक देवचंद मेश्राम याला ८ हजार रूपये, ७ मार्च रोजी चिचगड ग्रामीण रुग्णालय येथील प्रभारी वैद्यकीय अधिक्षक, राहुल बागडे याला १० हजार रूपये, ९ मार्चला गोंदिया समाज कल्याण सहायुक्त कार्यालयातील वरिष्ठ लिपीक अरुण मातोरी पराते याला ५ हजार रूपये, ५ एप्रिल रोजी आमगाव पंचायत समिती अंतर्गत टेकरी ग्रामपंचायतचे सरपंच कैलास बिसेन याला १५ हजार रूपये लाच घेताना रंगेहात पकडले.
१२ एप्रिलला गोंदिया नागपूर यांच्या संयुक्त पथकाने गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रभारी जिल्हा खनिकर्म अधिकारी व नायब तहसीलदार विनय कौलकर याला तब्बल २ लक्ष रूपयाची लाच घेताना अटक केली. गोंदिया पथकाने १८ एप्रिलला देवरी उपविभागीय कार्यालयातील स्वीय सहायक रविकांत पाठक याला ३० हजार, २९ एप्रिलला पालांदूरकरला २ हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली.