तलाव मोजतोय शेवटची घटका

By admin | Published: May 12, 2016 12:46 AM2016-05-12T00:46:18+5:302016-05-12T00:46:18+5:30

गाव तलाव दोन एकर परिसरात विस्तीर्ण असल्याची नोंद शासकीय दप्तरी आहे. मात्र गावात स्थायी होणाऱ्या अनेकांनी तलाव परिसरात

The last element to measure the pond | तलाव मोजतोय शेवटची घटका

तलाव मोजतोय शेवटची घटका

Next

नागरिकांचे अतिक्रमण : जलस्रोतात घट, ग्रामपंचायत प्रशासनाची तकलादू भूमिका
भंडारा : गाव तलाव दोन एकर परिसरात विस्तीर्ण असल्याची नोंद शासकीय दप्तरी आहे. मात्र गावात स्थायी होणाऱ्या अनेकांनी तलाव परिसरात अतिक्रमण करून वसाहत तर काहींनी शेतीच्या बांध्या बनविल्याने तलावाची स्थिती आता नाहिशी होण्याच्या मार्गावर आहे.
तलाठी रेकॉर्डवर तलाव ८१ आर क्षेत्रफळात असल्याची नोंद आहे. मात्र मागील अनेक वर्षांपासून या तलावाची देखभाल दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे त्याचे खोलीकरण आता सपाट मैदानात परिवर्तित झाले आहे. सुमारे दोन एकराचा तलाव आता केवळ अर्ध्या एकरापेक्षाही कमी जागेत एखाद्या डबक्यासारख्या दिसून येत आहे. यामुळे गावातील जलस्रोत मोठी घट निर्माण झाली आहे. तलावाचे अस्तित्व टिकून रहावे यासाठी खोकरला ग्रामपंचायतीने सुमारे दीड वर्षापूर्वी मासिक सभेत तलावाचे मोजमाप करून अतिक्रमण हटविण्याचा ठराव पारित करण्यात आला होता. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाच्या तकलाघू भूमिकेमुळे त्यांनी भूमिअभिलेख कार्यालयात मोजणीचे पैसे भरलेले नाही. त्यामुळे भविष्यात हा तलाव पूर्णत: नामशेष होणार असून भविष्यातील पिडीला गावात तलाव होते हे केवळ आख्यायिकेसारखीच माहिती सांगतील, असे संकेत सध्या दिसून येत आहे.
तलावाचे अस्तित्व अबाधीत ठेवल्यास गावातील पाणी समस्या नक्की सुटेल, असा विश्वास नागरिकांना आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाच्या सहकार्याची गरज आहे.

Web Title: The last element to measure the pond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.