तब्बल साडेसतरा तास जड वाहनांना शहरात प्रवेशबंदी
By admin | Published: February 1, 2015 10:49 PM2015-02-01T22:49:25+5:302015-02-01T22:49:25+5:30
शहरातील वाढते अपघात व वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन तब्बल साडेसतरा तास जड वाहनांना शहरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ३१ जानेवारी रोजी पोलीस उपायुक्त बि.के.गावराने
अमरावती : शहरातील वाढते अपघात व वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन तब्बल साडेसतरा तास जड वाहनांना शहरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ३१ जानेवारी रोजी पोलीस उपायुक्त बि.के.गावराने यांनी ही अधिसुचना जारी केली आहे.
अमरावती शहरात जड वाहने व हलकी मालवाहू वाहनांना सकाळी ६ ते रात्री ११.३० वाजेपर्यंत ये-जा करण्यास मनाई करण्यात आली आहे. केवळ रविवारी सुटी असल्यामुळे दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत वाहतुकीला शिथिलता देण्यात आली आहे. नांदगाव पेठ ते लोणी मार्गाहून पुढे ये-जा करणाऱ्या सर्व मालवाहू जड वाहनांना जुन्या बायपासवर प्रवेश करुन वाहतुकीस बंदी राहणार आहे. त्याचप्रमाणे अमरावती एमआयडीसी येथे ये-जा करणाऱ्या वाहनांना पावर हाऊस टि-पार्इंट ते बडनेरा जुनी वस्तीच्या बायपास मार्गांने बंदी राहणार आहे. नागपूर ते मुंबई, अकोला, यवतमाळ व बडनेराकडून नागपूरकडे जाणारी जड वाहने जुन्या बायपास मार्गाचा वापर न करता सुपर एक्सपे्रस हायवेचा वापर करतील अशा सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तरच शहरातील वाहतुकीला आळा बसू शकेल. रात्री माल चढ-उतार केल्यावर वाहने ट्रान्सपोर्ट नगरात पार्किंगमध्ये ठेवण्याचे निर्देश दिले आहे. सूचनेचे उल्लघंन करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश देण्यात आला आहे.