गोशाळेच्या उद्देशाला राजकीय द्वेषापोटी शेवटची घरघर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:21 AM2021-03-29T04:21:11+5:302021-03-29T04:21:11+5:30
लाखनी: तालुक्यातील रेंगेपार (कोहळी) येथील मातोश्री गोशाळेकरिता कायमस्वरूपी अतिक्रमित भूखंडाची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. सदर भूखंडाच्या क्रमांकाच्या बाबतीत ...
लाखनी: तालुक्यातील रेंगेपार (कोहळी) येथील मातोश्री गोशाळेकरिता कायमस्वरूपी अतिक्रमित भूखंडाची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. सदर भूखंडाच्या क्रमांकाच्या बाबतीत अडचणी निर्माण करून मुक्या जनावरांना आश्रय देण्यासाठी अडथळे निर्माण केले जात आहेत.
तलाठी साझा क्रमांक ११ भूखंड क्रमांक २१० व १७५ मधील आराजी ०.८० हेक्टर आर जमिनीची गोशाळेकरिता मागणी केली आहे. २००९ पासून रेंगेपार (कोहळी) व परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मातोश्री गोशाळा संस्थेची नोंदणी केली आहे. सदर गोशाळेचे एक गोठा (शेड), चारा गोडाऊन, गोप्रशिक्षण केंद्र, गांडूळ खत प्रकल्प, गो प्रदर्शन, गर्भार गायी, नवजात वासरे यांच्या खोल्यांचे व शेडचे बांधकाम अतिक्रमित भूखंडामध्ये केले आहे.
मातोश्री गोशाळेतून शेती विकास व पशुसंवर्धनाचे विविध उपक्रम राबविले जातात. शेतकऱ्यांचे प्रशिक्षण घेतले जाते. गोसेवा प्रशिक्षणावर ३० ते ३५ लक्ष रुपये खर्च केले आहे. गोशाळेत आमदार निधीतून विविध विहिरी तयार केल्या आहेत. गट क्रमांक २१० मध्ये १०० फूट लांबीचे शेड तयार केले आहे. त्यात २२५ ते २५० जनावरांची थंडी, ऊन, वारा, पाऊस यापासून बचाव करण्यासाठी निवासाची सोय केली आहे. गांडूळ खत व गोमूत्रावरील प्रयोगशाळा, गोबर गॅस, पाण्याची टाकी तसेच ६० फूट लांबीची एक लहान गोशाळा तयार केली. कर्मचाऱ्यांसाठी इमारत तयार केली आहे.
राज्य शासनाच्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्र हे नवीन योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. स्वयंसेवी संस्थामार्फत ही योजना राबविली जाते. त्यासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याचे शासकीय परिपत्रकात उल्लेख आहे. तरीही मातोश्री गोशाळेस भूखंड उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
सामाजिक कार्यात राजकीय हेवेदावे निर्वाण करून गाव विकासात अडचणी निर्माण केले जात आहे. गोमातेची सेवा करण्याच्या उद्देशाने मातोश्री शाळेची स्थापना केली; परंतु विरोधाच्या राजकारणामुळे चांगल्या उद्देशाला हरताळ फासला जात आहे.