शौचालय असेल तरच बोला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 10:58 PM2017-08-26T22:58:32+5:302017-08-26T22:58:32+5:30

तहसीलदार गायकवाड यांचा आगळा-वेगळा उपक्रम

latrine washim innovative drive | शौचालय असेल तरच बोला!

शौचालय असेल तरच बोला!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशात सर्वत्र शौचालयांचे बांधकाम व त्याच्या नियमित वापराबाबत सरकार व विविध संस्था तसेच चित्रपट आणि माध्यमांद्वारे अनेक उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केल्या जात आहे. यात एक पाऊल पुढे जात शासकीय सेवेत असताना विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासह वैयक्तिक पातळीवरूनही आपल्याकडे येणाºया प्रत्येक नागरिकांमध्ये शौचालयांबाबत सकारात्मक भावना निर्माण व्हावी, यासाठी तहसीलदार मनीष गायकवाड यांनी आपल्या ‘नेमप्लेट’च्या जागी ‘शौचालय असेल तरच बोला’, अशी पाटी लावून जनजागृती चालविली आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरात सध्या शौचालयांबाबत जनजागृतीसाठी व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. सद्यस्थितीत गुड मॉर्निंग पथकाद्वारेही कारवाई होत असल्याने ग्रामीण भागातही हळूहळू शौचालयांची उभारणी होत आहे. शौचालय उभारण्याची गती मात्र संथ असून, हव्या त्या प्रमाणात शौचालयांची उभारणी व त्याचा नियमित वापर होत नसल्याने यास गती यावी, यासाठी तहसीलदार मनीष गायकवाड यांनी हा आगळा-वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. चिखली तालुक्यात शौचालयांची व्याप्ती जलद गतीने वाढावी व तालुका १०० टक्के हगणदरीमुक्त व्हावा, यासाठी तहसीलदार गायकवाड यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांनी आपल्या नेम प्लेटच्या जागी ‘शौचलय असेल तरच बोला’ , अशी पाटी लावली आहे. तसेच त्यांच्या अधिनस्त सर्व कार्यालय आणि अधिकाºयांनाही अशा पाट्या लावण्याबाबत सुचविले आहे. यामुळे ग्रामीण भाग हगणदरीमुक्त होण्यास मदत होईल, असा विश्वास तहसीलदार गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. सध्या चिखली तालुका व शहरात हगणदरीमुक्तीची मोहीम युद्धपातळीवर राबविली जात असून, या कामी तहसीलदार गायकवाड यांनी वैयक्तिक पातळीवरूनही पुढाकार घेतल्याने त्यांच्या या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे.

 

Web Title: latrine washim innovative drive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.