आधारभूत धान खरेदी केंद्राचा शुभारंभ

By admin | Published: November 8, 2016 12:38 AM2016-11-08T00:38:47+5:302016-11-08T00:38:47+5:30

आदिवासी सेवा सहकारी सोसायटी अंतर्गत सालेकसा येथे धान खरेदी केंद्राचे उद्घाटन देवरी येथील आदिवासी ....

Launch of Aadhaar Paddy Purchase Center | आधारभूत धान खरेदी केंद्राचा शुभारंभ

आधारभूत धान खरेदी केंद्राचा शुभारंभ

Next

६० रूपये वाढ : पहिला शेतकरी ठरला सत्काराचा मानकरी
सालेकसा : आदिवासी सेवा सहकारी सोसायटी अंतर्गत सालेकसा येथे धान खरेदी केंद्राचे उद्घाटन देवरी येथील आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक टी.एन. वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर धान खरेदी केंद्राचे विधिवत शुभारंभ करण्यात आले.
सालेकसा येथील को-आॅपरेटिव्ह बँकेचे व्यवस्थापक सुनील कन्नमवार यांच्या हस्ते फित कापून, काटा पूजन करुन धान मोजणीला सुरुवात करण्यात आली. या वेळी विपणन निरीक्षक एम.आर. कुंभरे, सोसायटीचे अध्यक्ष मुलचंद गावराने, भाजप तालुका अध्यक्ष परसराम फुंडे, भाजप जिल्हा सचिव दिनेश शर्मा, सालेकसाचे माजी पं.स. सभापती बाबुलाल उपराडे, दरेकसा येथील आदिवासी सोसायटी अध्यक्ष शंकरलाल मडावी, संचालक योगराज पटले, कैलास दसरिया, जगन्नाथसिंह परिहार, जागेश्वर दसरिया, सोसायटीचे सचिव एस.के.मेश्राम, भाऊलाल वलथरे, रविंद्र प्रधान, मोतीलाल मेश्राम, दादूराम रहांगडाले, जियालाल चौधरी व इतर मान्यवर उपस्थित होते.
मागच्या वर्षीप्रमाणेच हेक्टरी ३० क्विंटल धान खरेदी-विक्रीची मर्यादा असून प्रति क्विंटल १ हजार ४७० रुपये भाव देण्यात येईल, अशी माहिती या वेळी टी.एन.वाघ यांनी दिली. मागील वर्षी १ हजार ४१० रुपये प्रति क्विंटल धानाला भाव होता. यंदा प्रति क्विंटल ६० रुपये प्रमाणे दर वाढविण्यात आले आहे.
देवरी विभागांतर्गत २२ सोसायट्याअंतर्गत सर्व २५ धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले असून सर्व ठिकाणी धानाची आवक सुरु झाली आहे. यंदाची धान खरेदी आॅनलाईन पद्धतीने झाली असून प्रत्येक शेतकऱ्यांचा सातबारा प्रथम नोंदणी झाल्यावर तो शेतकरी विक्री मर्यादेनुसार केव्हाही आपले शेतमाल विक्री करु शकतो. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Launch of Aadhaar Paddy Purchase Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.