कन्या समृद्धी योजनेचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:43 AM2021-07-07T04:43:31+5:302021-07-07T04:43:31+5:30
भंडारा : सामाजिक वनीकरण विभाग, भंडारा यांच्यामार्फत राबविण्यात येणारी कन्या समृद्धी योजनाअंतर्गत ११२ कन्या जन्मास आलेल्या आहेत. ...
भंडारा : सामाजिक वनीकरण विभाग, भंडारा यांच्यामार्फत राबविण्यात येणारी कन्या समृद्धी योजनाअंतर्गत ११२ कन्या जन्मास आलेल्या आहेत.
भंडारा तालुक्यात आई-वडिलांना प्रत्येकी १० झाडे देण्यात आली. एकंदरीत लागवडीमध्ये पूर्ण वृक्षारोपण ४ हजार ४४४ करण्यात येणार असून, ही लागवड मोहीम १५ जुलैपर्यंत घेण्यात येणार आहे.
तब्बल ९४ ग्रामपंचायतअंतर्गत ही मोहीम राबविली जाणार आहे. यासंदर्भात पार पडलेल्या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते पवन मस्के म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनची अत्यंत गरज असून, हा सामाजिक वनीकरण विभाग भंडारा यांच्या कडून राबविण्यात येणाऱ्या योजनेत सर्वांनी सहभाग घावा. या माध्यमातून नैसर्गिक ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकेल. कार्यक्रमाला पवन मस्के, राजू आगलावे, विभागीय अधिकारी रेश्मा काटे, वनपाल आर. टी. मेश्राम, एस. आर. दहिवले, वनरक्षक एस. एन. भांडे, वनरक्षक बंडू मेश्राम, बचत गट अध्यक्ष सविता धुर्वे, वनमजूर, ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.