जिल्ह्यात महारेशीम अभियानाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:24 AM2021-02-19T04:24:36+5:302021-02-19T04:24:36+5:30
भंडारा : रेशीम संचालनालयामार्फत संपूर्ण राज्यात महारेशीम अभियान राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्हा रेशीम कार्यालयाच्या वतीने रेशीम अभियानाची जनजागृती ...
भंडारा : रेशीम संचालनालयामार्फत संपूर्ण राज्यात महारेशीम अभियान राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जिल्हा रेशीम कार्यालयाच्या वतीने रेशीम अभियानाची जनजागृती करण्यासाठी रेशीम रथ तयार करण्यात आला आहे. या चित्ररथाचे उद्घाटन माेहाडी येथे तहसीलदार डी.सी. बाेंबार्डे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा रेशीम कार्यालयाचे वरिष्ठ तांत्रिक सहायक अनिल ढाेले, नायब तहसीलदार एम. एम. हुकरे, एस. ए. लाेणारे, आर. एम. लाेहारे यांच्यासह जिल्हा रेशीम कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित हाेते. राज्य शासनाने रेशीम शेतीचे महत्त्व शेतकऱ्यांना कळावे व त्यातून मळणाऱ्या हमखास शाश्वत उत्पन्नाची शेतकऱ्यांना ग्रामीण स्तरावर माहिती व्हावी यासाठी २०२१ मध्ये तुती लागवड व टसर रेशीम लाभार्थींची नाव नाेंदणी करण्यासाठी २५ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत राज्यभर महारेशीम अभियान राबविण्यात सुरुवात केली आहे. यावेळी प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी सभा घेतल्या जात आहेत. यामध्ये भंडारा तालुक्यातील काेथुर्णा गराडा बुज. बासाेरा खापा, तर पवनी तालुक्यातील निष्टी भुयार, मेंढेगाव, काकेपार, तर लाखांदूर तालुक्यातील मांढळ, आसाेला, माेहरणा, खैरणा, तर माेहाडी तालुक्यातील कान्हळगाव, कांद्री, पाहुणी येथे शेतकरी सभा घेण्यात आली आहे.