'रोपे आपल्या दारी' चा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 10:08 PM2018-06-29T22:08:57+5:302018-06-29T22:09:17+5:30

वनक्षेत्र कार्यालय साकोली येथे शासनाचे १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत रोपे आपले दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Launch 'Seedlings Your Dari' | 'रोपे आपल्या दारी' चा शुभारंभ

'रोपे आपल्या दारी' चा शुभारंभ

Next
ठळक मुद्देविविध प्रजातीच्या वृक्षांची लागवड : साकोली वनविभागाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : वनक्षेत्र कार्यालय साकोली येथे शासनाचे १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत रोपे आपले दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार बाळा काशिवार, नगराध्यक्ष धनवंता राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार डहाट, खंडविकास अधिकारी तडस, वनसंशोधन अधिकारी भीगारे, वनक्षेत्राधिकारी आरती उके उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात वृक्षांची पुजा करुन करण्यात आली. त्यानंतर वनकार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यात काजु, आंबा आवळा अशा विविध झाडांची लागवड करण्यात आली.
संचालन व्ही. एफ. सेलोकर यांनी तर, आभार वनरक्षक सपना सेलोकर यांनी मानले.

Web Title: Launch 'Seedlings Your Dari'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.