भटक्या कुत्र्यांसाठी जन्मदर नियंत्रण कार्यक्रम मोहीम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:47 AM2021-02-27T04:47:27+5:302021-02-27T04:47:27+5:30
भंडारा शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. मोकाट कुत्रे सर्वसामान्यांचा पिच्छा सोडायला तयार नाहीत. इतर शहरात ...
भंडारा शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. मोकाट कुत्रे सर्वसामान्यांचा पिच्छा सोडायला तयार नाहीत. इतर शहरात लाखो रुपये खर्च मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीवर करण्यात येतो; परंतु भंडारा शहरात भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीसाठी प्रयत्न होत नसल्याचे दिसून येते. काही दिवसांपूर्वी कुत्रे पकडण्याची मोहीम भंडारात राबविण्यात आली होती. आता पुन्हा शहरातील कुत्रे पकडून ते शहराच्या हद्दीबाहेर सोडण्याच्या अनुषंगाने नगरपालिका स्तरावरून हालचाली सुरू झाल्या आहेत. भंडारा शहरातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन नगर परिषद भंडारा व पीपल फॉर अनिमल्स भंडारा यांच्या विद्यमाने भटक्या कुत्र्यांना पकडणे, त्यांची नसबंदी करणे, रेबीजरोधक लसीकरण, तसेच त्वचा व इतर रोगाचे उपचार करणे या मोहिमेसाठी भंडारावासी व प्राणी मित्र यांच्याकडून नगर परिषद मुख्याधिकारी यांचे पुष्पगुछ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी पल्लवी रोटकर, नगरसेवक बंटी मिश्रा, संजय चौधरी, पंकज हुकरे, हर्षा वैद्य, मयूर सरोदे, बंटी अले, अजिंक्य वैद्य, राजू पटेल, नगरसेवक ॲड. विनय मोहन पशीने, जुमाला बोरकर, सोनु खोब्रागडे आदी उपस्थित होते.