बनावट बियाणे विक्रीविरूद्ध कायदा हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:11 AM2017-11-22T00:11:31+5:302017-11-22T00:12:48+5:30

जागतिक पातळीवर ज्या ९३ बनावट किटकनाशकावर बंदी घालण्यात आली आहे, त्या किटकनाशकांची भारतात खुलेआम विक्री सुरू आहे.

The law against the sale of counterfeit seeds | बनावट बियाणे विक्रीविरूद्ध कायदा हवा

बनावट बियाणे विक्रीविरूद्ध कायदा हवा

Next
ठळक मुद्देनाना पटोले : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार प्रश्न

आॅनलाईन लोकमत
भंडारा : जागतिक पातळीवर ज्या ९३ बनावट किटकनाशकावर बंदी घालण्यात आली आहे, त्या किटकनाशकांची भारतात खुलेआम विक्री सुरू आहे. यासाठी विदेशात कायदा तयार करण्यात आलेला आहे. भारतात हा कायदा नसल्यामुळे अशा किटकनाशकावर भारतातही बंदी घालण्याची गरज आहे, किटकनाशक व बनावट बियाणे विक्रीसाठी सबळ कायदा करण्यात यावा, हा विषय संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार असल्याचे खासदार नाना पटोले यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी कायदा व्हावा यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांच्याशी नागपुरात चर्चा केल्याचे सांगून खा.पटोले म्हणाले, मागीलवर्षी खरेदी करण्यात आलेली तुर डाळ बाजार समितींमध्ये पडून आहे. ज्या शेतकऱ्यांकडून ही डाळ खरेदी करण्यात आली त्यांना अद्याप पैसे मिळाले नसल्याचा आरोपही त्यांनी केला. शेतकरी कर्जमाफीची घोषणा होऊन साडेचार महिने लोटले असले तरी अद्याप शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही. यावर्षी अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात भीषण पाणी टंचाईचे सावट उद्भवणार असल्याची शक्यता वर्तवून यातून सुटका करण्यासाठी मालगुजारी तलावांचे खोलीकरण करून हे तलाव गाळमुक्त करण्याची गरज आहे. यासाठी मनरेगाचे निकष न लावता हे तलाव सरसकट खोल करण्याची गरज आहे. तेव्हाच त्याचा लाभ शेतकºयांना होऊ शकेल, असे सांगितले.
पुण्यात करणार गौप्यस्फोट
माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या उपस्थितीत पुणे येथे आयोजित कार्यक्रमात मालेगाव येथील बॉम्बस्फोटप्रकरणी गौप्यस्फोट करणार असल्याचे खा.पटोले यांनी सांगितले. या कार्यक्रमात यशवंत सिन्हा हे जीएसटी, नोटाबंदी या विषयावर बोलणार आहेत.
असे म्हणणे चुकीचे
यवतमाळ जिल्ह्यात किटकनाशक फवारणीमुळे ज्या शेतकºयांचा मृत्यू झाला, त्यांचा मृत्यू किटकनाशकामुळे झाला नसल्याचा अहवाल देण्यात आला आहे. या शेतकऱ्यांचा मृत्यू किटकनाशकामुळे झाला नव्हता तर त्यांच्यावर किटकनाशकाचा प्रभाव झाला म्हणूनच उपचार करण्यात आले होते, त्यामुळे या शेतकºयांचा मृत्यू किटकनाशकामुळे झाला नाही, असे म्हणने चुकीचे असल्याचे खा.पटोले यांनी सांगितले.

Web Title: The law against the sale of counterfeit seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.