एल.डी. गिऱ्हेपुंजे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 11:15 PM2019-05-13T23:15:43+5:302019-05-13T23:15:56+5:30
येथील इंडियन मेडिकल असोसिएशनचे आधारस्तंभ, विविध सामाजिक चळवळीचे प्रणेते आणि भंडाराभूषण डॉ. एल.डी. उपाख्य लोकनाथ गिऱ्हेपुंजे यांचे वृद्धापकाळाने रविवारी सायंकाळी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : येथील इंडियन मेडिकल असोसिएशनचे आधारस्तंभ, विविध सामाजिक चळवळीचे प्रणेते आणि भंडाराभूषण डॉ. एल.डी. उपाख्य लोकनाथ गिऱ्हेपुंजे यांचे वृद्धापकाळाने रविवारी सायंकाळी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते.
डॉ. एल.डी. गिऱ्हेपुंजे यांनी वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून भंडारा शहरात नवा आदर्श निर्माण केला होता. केवळ वैद्यकीय व्यवसाय नव्हे तर अनेक सामाजिक चळवळीत त्यांचा मोलाचा वाटा होता. अनेक वर्ष ते संताजी सेवा मंडळाचे अध्यक्ष होते. या माध्यमातून त्यांनी समाजाला एका सुत्रात बांधले होते. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या भंडारा शाखेचे ते आधारस्तंभ होते.
शहरातील कोणत्याही कार्यक्रमात डॉ. गिऱ्हेपुंजे यांची उपस्थिती असायची. बाल संस्कार शिबिर असो की, कोणताही कार्यक्रम डॉ. गिऱ्हेपुंजे यांच्याशिवाय कार्यक्रम पुढे जात नव्हता. अशा या समाजसेवी डॉ. गिऱ्हेपुंजे यांचे मरणोपरांत नेत्रदान करण्यात आले. त्यांच्या मागे डॉ. जयंत गिऱ्हेपुंजे व मोठा आप्त परिवार आहे. मंगळवार १४ मे रोजी सकाळी ८.३० वाजता वैनगंगा घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.