कॅशलेस व्यवहाराबाबत माहिती घ्यावी

By admin | Published: February 4, 2017 12:17 AM2017-02-04T00:17:18+5:302017-02-04T00:17:18+5:30

केंद्र व राज्य सरकारने रोखरहित व्यवहाराला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला असून ...

Learn about cashless transactions | कॅशलेस व्यवहाराबाबत माहिती घ्यावी

कॅशलेस व्यवहाराबाबत माहिती घ्यावी

Next

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी : श्रीगणेश हायस्कूल येथे जागृती मेळावा
भंडारा : केंद्र व राज्य सरकारने रोखरहित व्यवहाराला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला असून बँकांच्या माध्यमातून व साधन सुविधेतून नागरिकांनी कॅशलेस व्यवहाराबाबत संपूर्ण माहिती करुन घ्यावी. तसेच जास्तीत जास्त व्यवहार डिजिटल माध्यमाने करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
जिल्हा अग्रणी बँकेच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या कॅशलेस जागृती मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले. जिल्हा बँक व्यवस्थापक विजय बागडे, नाबार्ड महाव्यवस्थापक अरविंद खापर्डे व विविध बँकांचे व्यवस्थापक उपस्थित होते.
रोखरहित व्यवहाराची जागृती नागरिकांमध्ये व्हावी या उद्देशाने अग्रणी बँकेच्या पुढाकाराने भंडारा येथील श्रीगणेश हायस्कुल येथील पटांगणावर ४ फेब्रुवारीपर्यंत या दोन दिवसीय कॅशलेस जागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात एकूण २२ स्टॉल उभारण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक बँकेच्या स्टॉलला भेट देवून बँक नागरिकांना देत असलेल्या सुविधेबाबत माहिती करुन घेतली.
या मेळाव्यात नागरिकांना पॉस मशिनद्वारे रोखरहित व्यवहार कसे करावे याबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे. महावितरण कंपनीने या मेळाव्यात स्टॉल लावला असून मोबाईल अ‍ॅपद्वारे विज देयक भरण्यासंबंधीची उपयुक्त माहिती या स्टॉलवर देण्यात येत आहे. यासोबतच नागरिकांच्या तक्रारींचे निवारण आॅनलाईन पध्दतीने व वेगाने महावितरण कंपनी कशा पध्दतीने करते या संदर्भात माहिती देण्यात येते.
या मेळाव्यात विविध बँकांचे २२ स्टॉल आहेत. या सर्व बँकां रोखरहित व्यवहाराबाबत सादरीकरणातून ग्राहकांना माहिती पुरविण्याचे काम करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Learn about cashless transactions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.