खेळातून शिक्षण-जीवन कौशल्य विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:17 AM2021-01-24T04:17:07+5:302021-01-24T04:17:07+5:30
लाखनी तालुक्यातील ६वी ते ९वीच्या वर्गासाठी दोन शिक्षक, याप्रमाणे तालुक्यातील एकूण १२० शिक्षकांचे प्रशिक्षण १९ ते २२ जानेवारी ...
लाखनी तालुक्यातील ६वी ते ९वीच्या वर्गासाठी दोन शिक्षक, याप्रमाणे तालुक्यातील एकूण १२० शिक्षकांचे प्रशिक्षण १९ ते २२ जानेवारी पार पडले. प्रशिक्षण समारोपासाठी लाखनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डाॅ.शेखर जाधव, नरेश नवखरे, केंद्र प्रमुख संजिव वाढिवे उपस्थित होते. यावेळी शिक्षकांकडून प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. प्रशिक्षणासाठी शिक्षण विभाग पंचायत समिती अंतर्गत पाचही प्रशिक्षण केंद्रांवर सनियंत्रण अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली होती. यात शिक्षण विस्तार अधिकारी पुंडलिक राघोर्ते, केंद्र प्रमुख जयश्री दुधकवार, सुनीता मरसकोल्हे, खुशाल हरडे, शालिकराम कांबळे, नरेश नवखरे उपस्थित होते. यावेळी स्केल प्रकल्पाचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक निक्की प्रेमानंद, प्रशिक्षक मंगेश कांबळे, स्वप्निल जाधव, संदीप राऊत, सायली सरफरे व छाया गुरव, तालुका व्यवस्थापक वीरेंद्र देशमुख, शाळा सहायक अधिकारी प्रियंका रागीट, विवेक मलोडे, ममता तुपे, भूषण कोकुडे, किरण बागुल, तसेच समुदाय समन्वयक उपस्थित होते. यात लाखनी तालुक्यातील एकूण ८ केंद्रांतील शिक्षक सहभागी होते. या चार दिवसीय प्रशिक्षणात खेळाच्या माध्यमातून मुलांचा शारीरिक व बौद्धिक विकास व्हावा व त्यांच्यात जीवन कौशल्य विकासित व्हावीत, याचे प्रशिक्षण, तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही करण्यात आले. सदर प्रशिक्षण कोविडचे पालनात सुरक्षित अंतर पाळत मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या टीमकडून थर्मामीटर व पल्स ऑक्सिमीटरने तपासणी करून एकूण ५ केंद्रांवर प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान जिल्हा परिषद गांधी हायस्कूल लाखनी, गडेगाव येथे लाखनी व केसलवाडा केंद्राचे शिक्षक उपस्थित होते. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कनेरी येथे पोहरा व जेवनाळा, मुरमाडी तुप येथे पिंपळगाव व मुरमाडी तुप या केंद्राचे शिक्षक हजर होते.