बघेडा जलाशयात बावनथडीचे पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 10:44 PM2018-03-30T22:44:24+5:302018-03-30T22:44:24+5:30

तुमसर तालुक्यातील बघेडा जलाशयात पाण्याचा तुटवडा असल्यामुळे बघेडा, पवनारा, मिटेवानी, साखडी, मेहगाव येथील ६०० हेक्टर मधील उन्हाळी धानपीक सिंचनाअभावी धोक्यात आले आहे.

Leave Bawanthadi water in Bagheda reservoir | बघेडा जलाशयात बावनथडीचे पाणी सोडा

बघेडा जलाशयात बावनथडीचे पाणी सोडा

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : धान पीक करपण्याच्या मार्गावर

आॅनलाईन लोकमत
पवनारा : तुमसर तालुक्यातील बघेडा जलाशयात पाण्याचा तुटवडा असल्यामुळे बघेडा, पवनारा, मिटेवानी, साखडी, मेहगाव येथील ६०० हेक्टर मधील उन्हाळी धानपीक सिंचनाअभावी धोक्यात आले आहे. बघेडा जलाशयात बावनथडीचे पाणी सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
नोव्हेंबर २०१७ ला उन्हाळी धान रोवणीकरीता बघेडा जलाशय भरुन दिला होता. पुन्हा मार्चमध्ये जलाशय भरुन देण्याचे ठरले होते. त्या अनुषंगाने बघेडा जलाशय अंतर्गत पवनारा, बघेडा, साखडी, मिटेवानी, मेहगाव येथील शेतकऱ्यांनी ६०० हेक्टरमध्ये उन्हाळी धान रोवणी केली. आजपर्यंत सहा ते सात वेळा बघेडा जलाशयाचा पाण्याचा लाभ मिळाला.
परंतु सध्यस्थितीत बघेडा जलाशयात पाण्याचा तुटवडा असल्यामुळे सिंचनाअभावी बऱ्याच शेतकऱ्यांचे धान पिक करपण्याच्या मार्गावर आले आहे. सिंचनाअभावी पिक करपले तर मोठे अनर्थ नाकारता येणार नाही. मागील दोन-तीन वर्षापासून येथील शेतकऱ्याला दुष्काळाचा चांगलाच फटका बसला आहे. कुणाचे पिक सिंचनाअभावी तर कुणाचे पिक किडीमुळे करपल्यामुळे पिकात घट झालेली आहे. स्वत:ला सावरण्याच्या प्रयत्नात कर्ज काढून उन्हाळी धान रोवणी केली व आता बघेडा जलाशयात पाण्याचा तुटवडा पडल्यामुळे सिंचन होणार कसे? या विवंचनेत बघेडा, पवनारा परिसरातील शेतकरी आहेत.

Web Title: Leave Bawanthadi water in Bagheda reservoir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.