सरपंचपद आरक्षणाची सोडत फेब्रुवारी महिन्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:17 AM2021-01-24T04:17:34+5:302021-01-24T04:17:34+5:30
तुमसर : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर सदस्यांना सरपंचपदाचे डोहाळे लागले आहेत. तुमसर तालुक्यातील सरपंचपदाची आरक्षण सोडत ३ ते ४ फेब्रुवारी ...
तुमसर : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर सदस्यांना सरपंचपदाचे डोहाळे लागले आहेत. तुमसर तालुक्यातील सरपंचपदाची आरक्षण सोडत ३ ते ४ फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती आहे. याकरिता निवडणूक विभागाची सरपंच आरक्षणा सोडतीकरिता धडपड सुरू आहे.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सरपंचपदाची आरक्षण सोडत १० ते १२ दिवसांत घेण्याचे निर्देश स्थानिक निवडणूक विभागाला दिले होते दिले होते. त्याअनुषंगाने सांगली निवडणूक विभागाची सरपंच आरक्षणकरिता नियोजन सुरू करण्यात आले आहे. येत्या ३ ते ४ फेब्रुवारी रोजी सरपंचपदाचे आरक्षण होणार असल्याची माहिती आहे.
बॉक्स
नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य भ्रमंतीवर जाणार
सरपंच आरक्षण सोडत निघाल्यानंतर इच्छुक ग्रामपंचायत सरपंच सदस्यांसह भ्रमंतीवर जाणार असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. सध्या सरपंचपदाकरिता मोर्चेबांधणी सुरू आहे. आता प्रतीक्षा आहे ती सरपंच आरक्षणाची बहुमताने पॅनल निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांमध्ये सरपंच कोण होणार, कुणाची सोडत निघणार या चर्चेला उधाण आलेले आहे. अनेकजण सरपंचाची माळ आपल्या गळ्यात कशी पडेल या विचारात आहेत. अखेर सरपंच आरक्षणानंतरच सरपंच कोण होणार हे चित्र स्पष्ट होईल. अनेक पॅनलमध्ये राखीव उमेदवार नाहीत. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काहींचे पॅनल निवडून आले त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत आहे; परंतु काही पॅनलमध्ये काही राखीव उमेदवार उपलब्ध नसल्याने विरोधी पक्षाकडे राखीव उमेदवार नसल्याने त्यांना सरपंचपद येथे मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अनेकांचे सरपंच होण्याचे स्वप्न येथे भंगणार असल्याची चर्चा सुरू आहे.
बॉक्स
अर्थकारणाला महत्त्व
सरपंचपद हस्तगत करण्याकरिता अनेकांनी मोर्चेबांधणी केली असली तरी अखेरच्या क्षणाला अर्थकारणाला मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे. येथे अपक्ष सदस्यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार आहे. काही ग्रामपंचायतींमध्ये घोडेबाजाराला आतापासूनच सुरुवात झाल्याचे समजते. पंचायतराज लागू झाल्याने केंद्र व राज्य शासनाच्या मोठा निधी थेट ग्रामपंचायतीकडे येतो. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. राजकारणाची दिशा गावातूनच पुढे सरकते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. गावात आपलाच सरपंच व्हावा याकरिता राजकीय पक्षानेसुद्धा कंबर कसलेली दिसत आहे.