लाखनीच्या विदर्भ महाविद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 12:11 AM2019-09-02T00:11:55+5:302019-09-02T00:12:38+5:30
वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे व अंनिस तर्फे जादूटोणा विरोधी कायदा व वैज्ञानिक दृष्टीकोन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.दामोधर रामटेके होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : येथील विदर्भ कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे व अंनिस तर्फे जादूटोणा विरोधी कायदा व वैज्ञानिक दृष्टीकोन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.दामोधर रामटेके होते. प्रमुख वक्ते अंनिसचे जिल्हा अध्यक्ष मदन बांडेबुचे, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अंनिसचे सदस्य प्रिया शहारे व पी.डी. शहारे उपस्थित होते. अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रिया शहारे यांनी गीतगायनातून व व्याख्यानातून विविध प्रसंग सांगितले. आपल्या भागातील समस्या कशी दूर करता येईल. यावर मार्गदर्शन केले.
प्रमुख वक्ते मदन बांडेबुचे यांनी विद्यार्थ्यांसमोर प्रयोगाद्वारे समाजातील अंधश्रद्धा कशी फोफावत आहे हे दाखविले. समाजातील ढोंगी साधू चमत्काराद्वारे सामान्य लोकांची कशी फसवणूक करतात हे सांगितले. अशा लोकांपासून सावध राहावे तसेच जादूटोणाविरोधी कायदा व वैज्ञानिक दृष्टीकोन याविषयी १२ कलमांचे वाचन केले. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून लाभलेले प्रा.रामटेके यांनी विविध अंधश्रद्धा कशा अंगवळणी पडल्या आहेत हे विषद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.नाजूकराव बनकर यांनी केले.
संचालन दिपाली बावनकुळे हिने तर आभार प्रा.पराग हेडाऊ यांनी मानले. कार्यक्रमाकरिता प्रा.लुले, धरमसारे, डॉ.सुरेश खोब्रागडे, प्रा.डॉ.अमीत गायधनी, डॉ.निलीमा कापसे, प्रा.संजय गिºहेपुंजे व प्रा.राखी तुरकर व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यांच्यासह अंनिसचे पदाधिकारी सहकार्य केले.