‘त्या’ बिबट्याचा मृत्यू विजेच्या धक्क्याने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 10:20 PM2018-10-25T22:20:06+5:302018-10-25T22:20:44+5:30

तालुक्यातील बाम्पेवाडा येथील तलावात मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्याचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालात पुढे आले. वन्यप्राण्यांपासून रक्षणासाठी लावलेल्या विद्युत प्रवाहित तार कुंपनात अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याचा संशय असून प्रकरण रफादफा करण्यासाठी मृतदेह तलावात फेकला असावा.

'That' leopard dies due to electricity | ‘त्या’ बिबट्याचा मृत्यू विजेच्या धक्क्याने

‘त्या’ बिबट्याचा मृत्यू विजेच्या धक्क्याने

Next
ठळक मुद्देबाम्पेवाडाची घटना : रफादफा करण्यासाठी मृतदेह फेकला तलावात

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : तालुक्यातील बाम्पेवाडा येथील तलावात मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्याचामृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालात पुढे आले. वन्यप्राण्यांपासून रक्षणासाठी लावलेल्या विद्युत प्रवाहित तार कुंपनात अडकून बिबट्याचामृत्यू झाल्याचा संशय असून प्रकरण रफादफा करण्यासाठी मृतदेह तलावात फेकला असावा.
साकोली तालुक्यातील बाम्पेवाडा येथील खोंड्या तलावात बिबट्याचा मृतदेह बुधवारी आढळून आला. ३ ते ४ वर्षाचा बिबट मृतावस्थेत आढळल्याने वनविभागात एकच खळबळ उडाली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह बाहेर काढला. शवविच्छेदन केले असता, या बिबट्याचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाल्याचे पुढे आले. वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी अनेक शेतकºयांनी तार कुंपन केले आहे. त्या तार कुंपनात रात्रीच्यावेळी विज प्रवाह सोडला जातो. सदर बिबट शिकारीचा शोधात फिरत असतांना विद्युत भारीत ताराचा स्पर्श होऊन त्याचा मृत्यू झाला असावा. प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून संबंधिताने या बिबट्याचा मृतदेह खोंड्या तलावात फेकला असावा असा संशय आहे.
शवविच्छेदन पशुवैद्यकिय अधिकारी हेडाऊ यांनी केले. तसेच गडेगाव डेपोत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी वाय. एस. तांडेकर, वनक्षेत्रअधिकारी व्ही. जी. कोई, सहायक वनरक्षक चोपकर, बीट रक्षक एम. यु. गिरीपुंजे, आर. बी. पडोळे, एन. एस. निखार, एन एन तपते उपस्थित होते.
भंडारा वन विभागात मोठ्या प्रमाणात वन्य जीवांचा संचार आहे. मात्र त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने असलेल्या उपाययोजना अपुºया पडत आहेत. अलिकडे शेतकरी पीक वाचविण्यासाठी विविध उपाय करीत आहेत. वन्य प्राणी शेतात शिरू नये म्हणून कुंपणामध्ये विजेचा प्रवाह सोडतात. अशा प्रकारामुळे वन्य प्राण्यांचे जीव धोक्यात आले आहे.
सहा दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा संशय
खोंड्या तलावात आढळलेल्या बिबट्याचा मृत्यू सहा दिवसांपूर्वीच झाला असावा असा संशय आहे. अद्यापपर्यंत शिकारापर्यंत पोहचण्यास वनविभागाला यश आले नाही. बाम्पेवाडा, उमरझरी परिसरात लागूनच न्यू नागझीरा व इतर जंगल आहे. उन्हाळ्यात उमरझरी येथे पाच सहा रानगव्यांचा मृत्यू झाला होता. आलेबेदर येथे एका रानगव्याची शिकार करण्यात आली होती. पंरतु अद्यापही शिकाराचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे या बिबट्याचे शिकारी कधी सापडतील हा प्रश्न आहे. वनविभागाचे फिरते पथक असतांना ही ते खरोखर सक्रिय आहे काय? याची शोध घेण्याची गरज आहे.

Web Title: 'That' leopard dies due to electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.