बिबट्याने गोठ्यातील कुत्र्याला केले ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:22 AM2021-07-22T04:22:33+5:302021-07-22T04:22:33+5:30
केशोरी : येथून ३ किमी. अंतरावरील केळवद या गावातील दिनेश पाटील रहांगडाले यांच्या गोठ्यात बांधलेल्या रोटव्हिलर जातीच्या कुत्र्याला बिबट्याने ...
केशोरी : येथून ३ किमी. अंतरावरील केळवद या गावातील दिनेश पाटील रहांगडाले यांच्या गोठ्यात बांधलेल्या रोटव्हिलर जातीच्या कुत्र्याला बिबट्याने ठार करून फस्त केल्याची घटना नुकतीच घडली. शिवाय अनेकदा बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये चांगलीच दहशत पसरली आहे.
गेल्या ८ दिवसांपासून दररोज रात्रीला केळवद येथील शेतशिवारात बिबट्याचा वावर वाढला आहे. राजू बारापात्रे यांच्यासह अनेकांना बिबट दिसल्याचे सांगण्यात आले. कधी कोंबड्या तर कधी गावातील मोकाट कुत्र्यांना बिबट ठार करीत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यातच ४ दिवसांपूर्वी रहांगडाले यांच्या गोठ्यात बांधलेल्या रोटव्हिलर जातीच्या कुत्र्याला ठार मारुन खाल्ल्याची घटना घडली आहे. यामुळे केळवद गावात बिबट्याला घेऊन दहशत पसरली आहे. त्यामुळे वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.