बिबट्याने केली शेळी,बैलाची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 11:38 PM2018-03-14T23:38:39+5:302018-03-14T23:38:39+5:30
जिल्ह्यातील लाखांदूर वनपरिक्षेत्र अंतर्गत दांडेगाव जंगल परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. दांडेगाव येथील प्रभाकर कचरू बुरडे यांच्या मालकीचा बैल तर ईश्वर सयाम यांच्या मालकीच्या शेळीवर हल्ला करून ठार केले. ही घटना मंगळवारला रात्रीच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बारव्हा : जिल्ह्यातील लाखांदूर वनपरिक्षेत्र अंतर्गत दांडेगाव जंगल परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. दांडेगाव येथील प्रभाकर कचरू बुरडे यांच्या मालकीचा बैल तर ईश्वर सयाम यांच्या मालकीच्या शेळीवर हल्ला करून ठार केले. ही घटना मंगळवारला रात्रीच्या सुमारास घडली.
दांडेगाव परिसरातील अशी पहिलीच घटना नसून अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. या घटनांमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये पुन्हा दहशत निर्माण झालेली आहे. वनविभाग रात्रीला देखरेख करीत असले तरी त्यावर बंदोबस्त करण्यात असमर्थ ठरले आहेत. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वनविभागाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणीही होत आहे. तसेच वनविभागाने कायमस्वरुपी योजना म्हणून वनविभागाच्या सिमेवर झालेर कुंपणाची व्यवस्था करण्याचीही गरज आहे.