पिंपळगाव येथे बिबट्याचा धूमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:24 AM2021-06-29T04:24:16+5:302021-06-29T04:24:16+5:30
लाखनी ते अड्याळ मार्गावर पिंपळगाव जंगलव्याप्त गाव म्हणून प्रसिध्द आहे. याठिकाणी बहुसंख्येत आदिवासी समाजबांधव असतात. या गावालगत केसलवाडा जंगल ...
लाखनी ते अड्याळ मार्गावर पिंपळगाव जंगलव्याप्त गाव म्हणून प्रसिध्द आहे. याठिकाणी बहुसंख्येत आदिवासी समाजबांधव असतात. या गावालगत केसलवाडा जंगल आहे. या जंगलात वन्यप्राण्यांचा वावर आहे. गत चार दिवसांपासून वाटसरुंना बिबट्याचे दर्शन हाेत आहे. रविवारी पिंपळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेलगत बिबट्याचे दर्शन झाले. सदर बिबट रात्रीला गावात येत असल्याच्या चर्चेने पिंपळगाव वासीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या गावातील पथदिवे रात्रीला बंद असतात. राज्य शासनाने पथदिवे देयके जिल्हा परिषदकडे भरण्याचे आदेश असले तरी आतामात्र प्रशासनाने पंधराव्या वित्त आयाेगातून देयके अदा करण्याचे आदेश दिले आहे. सध्यातरी जिल्ह्यातील अनेक गावातील पथदिवे बंद आहेत. त्याचाच फटका पिंपळगाव वासीयांना बसत आहे. पथदिवे बंद असल्याने अंधाराचा फायदा घेत बिबट गावात संचार करीत आहे. या बिबट्याच्या भीतीपाेटी नागरिकांची भंबेरी उडत आहे. या मार्गावरुन दरराेज शेकडाे नागरिक ये-जा करतात. अद्यापही बिबट्याने कुठलीही जीवित हानी केली नसली तरी संभाव्य धाेका लक्षात घेता उपाययाेजना करण्याची मागणी हाेत आहे. यापूर्वीदेखील वन्यप्राणी गावात येत असल्याचे चर्चेला उधाण आले हाेते. आता पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर मानव-वन्य प्राणी संघर्ष हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. वनविभागाने बिबट्याचा तातडीने बंदाेबस्त करावा, अशी मागणी हाेत आहे.