वारपिंडकेपार येथे बिबट्याची दहशत, दोन शेळ्यांची शिकार
By युवराज गोमास | Published: September 7, 2023 04:34 PM2023-09-07T16:34:29+5:302023-09-07T16:35:59+5:30
मानव व वन्यजीव संघर्ष वाढण्याची भीती
युवराज गोमासे/ भंडारा: सातपुडा पर्वत रांगा आणि ग्रीन व्हॅली चांदपूरच्या विस्तारित जंगल शेजारील गावांत बिबट्याची दहशत वाढली आहे. वरपिंडकेपार गावांत बिबट्याने दहशत माजविली आहे. गोठयात बांधलेल्या दोन शेळ्या बिबट्याने फस्त केल्याची घटना बुधवारला सकाळी उघडकीस आली आहे. घटनेची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. शेळ्यांची शिकार होण्याची ही दुसरी घटना आहे. यामुळे गावात भीती वातावरण निर्माण झाले आहे.
सातपुडा पर्वत रांगाचे घनदाट जंगलात व ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटन स्थळाचे विस्तारित जंगलात वाघ, बिबट व रानडुक्कराची संख्या आहे. वन्यप्राणी गावात व शेतशिवारात धुमाकूळ घालीत असल्याने वन्यजीव व मानवी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. जंगलांशेजारी अनेक गावांचे वास्तव्य आहे. वरपिंडकेपार गावांचे शेजारी विस्तारित जंगल असल्याने वन्यप्राणी गावांचे दिशेने धाव घेत आहेत.
वारपिंडकेपार येथे शिशुपाल किरणापुरे यांनी त्यांच्या मालकीच्या शेळ्या गोठयात बांधल्या होत्या. रात्रीच्या सुमारास बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला. यात दोन शेळ्या ठार झाल्या आहेत. वनविभागाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. गावात बिबट्याचे पगमार्क आढळून आले आहे.