भंडारा जिल्ह्यात सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या घरी सापडले बिबट्याचे कातडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 02:48 PM2019-07-08T14:48:55+5:302019-07-08T14:52:33+5:30

मोहाडी तालुक्यातील जांब (कांद्री) येथील सेवानिवृत्त राऊंड ऑफीसर देवेंद्र चकोले यांच्या घरी सापडले बिबट्याचे कातडे आढळून आल्याचे एकच खळबळ उडाली आहे.

The leopard's skin found on the retired officer's house | भंडारा जिल्ह्यात सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या घरी सापडले बिबट्याचे कातडे

भंडारा जिल्ह्यात सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या घरी सापडले बिबट्याचे कातडे

googlenewsNext
ठळक मुद्देडिएफओ विवेक होशिंग घटनास्थळी दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मोहाडी तालुक्यातील जांब (कांद्री) येथील सेवानिवृत्त राऊंड ऑफीसर देवेंद्र चकोले यांच्या घरी सोमवारी सकाळी  बिबट्याचे कातडे आढळून आल्याचे एकच खळबळ उडाली आहे. सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या घरातील सामान अन्यत्र हलविताना प्रकार उघडकिला आल्याची प्राथमिक माहिती आहे. आठ दिवसांपूर्वीच चकोले सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या घरी कातडे कुठून आले व ते घरी ठेवण्याचे काय कारण, याचा तपास सुरू झाला असून डीएफओ विवेक होशिंग घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Web Title: The leopard's skin found on the retired officer's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.