वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांची नगदी पिकांकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:23 AM2019-04-27T00:23:21+5:302019-04-27T00:24:16+5:30

जिल्ह्यात धान पिकांचे पारंपरिक उत्पादन मोठ्या घेतले जाते. परंतू वाढत्या उत्पादन खर्चामुळे धान उत्पादक शेतकरी ऊस पिकासह कापूस, सोयाबीन यासारख्या नगदी पिकांकडे वळला आहे.

Lesson to the farmers' cash crops due to wildlife | वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांची नगदी पिकांकडे पाठ

वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांची नगदी पिकांकडे पाठ

googlenewsNext
ठळक मुद्देवनविभागाकडून जनजागृतीचा अभाव : विविध कारणांमुळे पारंपरिक शेतीकडे कल वाढला

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात धान पिकांचे पारंपरिक उत्पादन मोठ्या घेतले जाते. परंतू वाढत्या उत्पादन खर्चामुळे धान उत्पादक शेतकरी ऊस पिकासह कापूस, सोयाबीन यासारख्या नगदी पिकांकडे वळला आहे. जिल्ह्यात वन्यप्राणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा नगदी पिकांकडे पाठ फिरवु लागला आहे. वारंवार वाढणाऱ्या वन्यप्राण्यांच्या घटनांमुळे शासनाकडून कोणतीच ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. वनविभागाचे वारंवार उंबरठे झिजवूनही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत नाही. परिणामी अनेक शेतकरी पुन्हा एकदा पारंपारिक पध्दतीच्या धान पिकाकडे वळत आहे.
भंडारा जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांनी नगदी पिकाकडे वळून आपला उत्कर्ष साधावा असा सल्ला प्रशासकीय अधिकारी, कृषी शास्त्रज्ञ कार्यक्रमादरम्यान देत असतात. परंतू वन्यप्राण्यांच्या वाढत्या समस्या,खताचे वाढते भाव यावर कोणत्याच उपाययोजना होत नसल्यामुळे शेतकºयांना नाईलाजास्तव पुन्हा एकदा पारंपारिक धान शेतीचा पर्याय निवडावा लागत आहे.
जिल्ह्यातील साकोली, करडी, पवनी, देव्हाडा, मोहाडी येथे अनेक शेतकºयांनी नगदीपिकाचे चांगले उत्पन्न मिळवून देणारे ऊस पिक म्हणून मोठ्या प्रमाणात लागवड सुरु केली होती. परंतू कारखाण्याकडून शेतकऱ्यांची ऊस बिले सहा महिने लोटले तरी न मिळाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोडमडले. तसेच अन्य कोणत्याच सबसिडी स्वरुपात अनुदान नसल्याने शेतकरी ऊस,कपाशी पिकाची टाळाटाळ करीत आहे. तसेच खमारी, जवाहरनगर,मोहदुरा याठिकाणच्या शेतकऱ्यांनी कापुस पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली होती. अपेक्षीत नफाही मिळाला. परंतू कापसाच्या शेतात वाढत्या रानडुकरांच्या संख्येमुळे शेतकऱ्यांवर हल्ले होण्याच्या घटनां मध्ये वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना शेतशिवारात दहशतीच्या छायेखाली वावरावे लागत आहे. जिल्ह्यात २० हजार हेक्टर ऊसपिकाची लागवड केली गेली. जिल्ह्यात असणाऱ्या कारखान्याकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे असतांना, प्रोत्साहन तर नाहीच पण शेतकऱ्यांची वेळेत बिले न काढल्यामुळेच शेतकऱ्यांचा नगदी पिकाकडचा कल कमी होत आहे. शेतकºयांचे जीवनमान उंचावण्यासाठी उपाययोजनेची गरज आहे.

वन्यप्राण्यांचा वाढता अधिवास धोक्याचा
कापूस, ऊस सोयाबीन यासारख्या पिकांमुळे वन्यप्राण्यांचा शेतातील वावर वाढतो. परिणामी हरिण, रानडुकर, निलगाय, माकडांचे कळप हिरवा चारा व पाण्यासाठी सुरक्षीत जागा यामुळे अशा पिकांकडे ंआपला मोर्चा वळवितात. तसेच रात्रीच्या वेळी अस्वल, ससे, रानडुकर तसेच त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या शिकारीसाठी बिबट, लांडगे यांचाही वावर वाढतो. त्यामुळेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांवर व शेतमजुरांवर वन्यप्राण्यांच्या हल्ला झाल्याच्या घटना वाढल्या आहेत.

तुटपुंजी मदत
गेल्या दोन वर्षातील पावसाची सततची अनियमितता असल्यामुळ शेतकºयांच्या उत्पन्नात घट झाली आहे. तसेच भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कपासीसह मिरची, फळबागा, ऊस पिकांच्या लागवड क्षेत्रात घट झाली आहे. शासनाकडून हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना दिवसेंदिवस वाढता उत्पादन खर्चामुळे शेती करणे कठिण होत आहे. शासनाकडून तुटपुंजी मदत दिली जाते.

Web Title: Lesson to the farmers' cash crops due to wildlife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.