महसूल व वनविभागाने फिरविली चौकशीकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:14 AM2017-12-05T00:14:30+5:302017-12-05T00:14:45+5:30

मुरुम खननापूर्वी सीमांकन करण्यात आले नाही. तलाव काठावरील मुरुम खनन करण्यात आल्याने येथील वृक्षांना धोका पोहोचला आहे.

Lessons from Revenue and Forest Department | महसूल व वनविभागाने फिरविली चौकशीकडे पाठ

महसूल व वनविभागाने फिरविली चौकशीकडे पाठ

googlenewsNext
ठळक मुद्देप्रकरण घाटी तलावातील खननचे : तहसीलदार म्हणतात सीमांकन नाही, लाल रेषा केली जात

मोहन भोयर।
आॅनलाईन लोकमत
तुमसर : मुरुम खननापूर्वी सीमांकन करण्यात आले नाही. तलाव काठावरील मुरुम खनन करण्यात आल्याने येथील वृक्षांना धोका पोहोचला आहे. याप्रकरणी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. महसूल व वनविभाग याची सोमवारला चौकशी करणार होता. मात्र, या समितीने चौकशीकडे पाठ फिरविली.
सोदेपूर खैरटोला रस्त्याशेजारी घनदाट जंगलात घाटी तलावातून महसूल प्रशासनाने मुरुम खननची परवानगी दिली. तलावाच्या काठावरुन खनन करण्यात आले. ५०० ब्रास मुरुम खननाची परवानगी महसूल विभागाने दिली आहे. एक मीटरपेक्षा जास्त खोल तलावात खोदकाम करता येत नाही. येथे एक मिटरपेक्षा कितीतरी जास्त खोल मुरुमाचे खनन करण्यात आले आहे. तलाव काठावरील झाडांचे मुळ खुले पडले असून वृक्षांना धोका पोहोचविण्यात आला आहे. वनविभागाने या गंभीर प्रकरणाची अद्याप दखल घेतली नाही. महसूल विभागाने ५०० ब्रास मुरुम खननाची परवानगी दिली. तलावात अनेक गट असतात. त्यापैकी काही गटातून मुरुम खनन करण्याची परवानगी येथे दिली. गटात लाल रेषेने तो भाग अंकीत केला आहे. सीमांकन केले जात नाही अशी माहिती तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांनी ‘लोकमत’ला दिली. घाटी तलाव घनदाट जंगल परिसरता असून तलावाची मालकी जिल्हा परिषदेची आहे. मुरुम खनन करण्याच्या अटी व शर्ती असतात. तलाव क्षेत्र मोठे असल्याने निश्चितच गट जास्त असतील, पंरतु नेमक्या कोणत्या गटातून कुठून मुरुम खनन केले जात आहे. त्याची देखरेख करण्याची येष्ोि निश्चितच गरज आहे. तलाव काठावरुन मुरुम खनन करण्याची येथे परवानगी आहे काय? हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे.
वनविभागाने येथे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. वृक्षांना धोका पोहचविल्याप्रकरणी येथे चौकशी व तपासणी करण्याची गरज होती. वनपरिक्षेत्राधिकारी अरविंद जोशी यांनी सोमवारला मौका चौकशी करण्यात येईल, असे सांगितल्यावरही ते गेले नाही. त्यामुळे वनाधिकाºयांच्या कार्यप्रणालीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तलावातील खड््यांमुळे वन्यप्राणी तथा मनुष्यांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता येथे निर्माण झाली आहे. दोन्ही विभाग येथे गंभीर नाही, असे दिसून येत आहे.

तलावातील मुरुम खनन प्रकरणात गटातील शीटमध्ये लाल रेषेने तो भाग दाखविण्यात येतो. सिमांकन केले जात नाही. संबंधित कंत्राटदाराने त्या अंगीत गटातूनच मुरुम उत्खनन करावे. चौकशी केल्यानंतर दोषीवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. याप्रकरणी माहिती ‘लोकमत’ वृत्तपत्रातून मिळाली.
- गजेंद्र बालपांडे, तहसीलदार, तुमसर
सोमवारी अति आवश्यक काम आल्याने नागपूर येथे आहे. त्यामुळे मुरूम खनन प्रकरणी मौका चौकशी करायला जाऊ शकलो नाही. याची मंगळवारला सकाळी मौका चौकशी करणार आहे.
- अरविंद जोशी, वनपरिक्षेत्राधिकारी, तुमसर
घाटी तलाव प्रकरणातील मुरुम खनन प्रकरणाची रितसर तक्रार आपले सरकार पोर्टलवर सोमवारी केली. राज्य शासनाने पारदर्शक प्रशासनाकरिता हे पोर्टल सुरु केले आहे. त्यामुळे चौकशी नक्कीच होईल.
- कमलाकर निखाडे, सामाजिक कार्यकर्ता तुमसर

Web Title: Lessons from Revenue and Forest Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.