चित्ररथाच्या माध्यमातून जिल्हाभर रेशीम शेतीचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 09:26 PM2018-12-25T21:26:16+5:302018-12-25T21:26:36+5:30

तुती लागवड करण्यासाठी महा रेशीम अभियान हाती घेण्यात आले असून नागपूर येथे १५ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या अभियानाच्या माध्यमातून विदर्भातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीचे धडे दिल्या जात आहेत. यातून रेशीम उद्योगाला चालना मिळत असून भंडारा जिल्ह्यातही रेशीम रथ यात्रेच्या माध्यमातून गावोगावी रेशीम प्रकाल्पाचे धडे दिले जात आहेत.

Lessons of Silk Farming Through District | चित्ररथाच्या माध्यमातून जिल्हाभर रेशीम शेतीचे धडे

चित्ररथाच्या माध्यमातून जिल्हाभर रेशीम शेतीचे धडे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तुती लागवड करण्यासाठी महा रेशीम अभियान हाती घेण्यात आले असून नागपूर येथे १५ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या अभियानाच्या माध्यमातून विदर्भातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीचे धडे दिल्या जात आहेत. यातून रेशीम उद्योगाला चालना मिळत असून भंडारा जिल्ह्यातही रेशीम रथ यात्रेच्या माध्यमातून गावोगावी रेशीम प्रकाल्पाचे धडे दिले जात आहेत.
नवीन तुती लागवड करण्याकरिता उत्सुक असलेल्या शेतकºयांची नोंदणी करण्यासाठी महा-रेशीम अभियान २०१९ हाती घेण्यात आले आहे. हे अभियान १५ ते २९ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. या महा रेशीम रेशीम अभियानाचे उद्घाटन १५ डिसेंबर रोजी नागपूर येथील वसंतराव देशपांडे सभागृहात सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख यांचे हस्ते झाले. या कार्यक्रमात नागपूर शहरात रेशीम रथ यात्रा काढण्यात आली. या प्रसंगी रेशीम पुस्तिका, रेशीम ग्राम संकल्पनेचे अनावरण करण्यात आले. हे महारेशीम अभियान भंडारा जिल्ह्यात राबविण्यात आली. निवडक गावात रेशीम रथ रेशीम शेतीची माहिती देउन शेतकºयांची रेशीम शेतीसाठी निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकºयांनी नवीन तुती लागवडीकरीता नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा रेशीम कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
महारेशीम अभियानाचा प्रचार रथ सज्ज
जिल्ह्यात २९ डिसेंबर पर्यंत महारेशीम अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानादरम्यान नवीन तुती लागवड करून रेशीम उद्योग करण्यास उत्सुक असलेल्या शेतकºयांची नोंदणी करण्यात येणार आहे. या अभियानाच्या प्रचारासाठी रेशीम रथ तयार करण्यात आला असून या रथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवून नुकतेच करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, मनिषा दांडगे, गायकवाड, नाखले, अनिल ढोले, सुषमा लोणारे, पवन कडमकर, विशाल बांते आदी उपस्थित होते.
राज्यात भंडारा अव्वल
नागपूर येथे महारेशम अभियानाचा शुभारंभप्रसंगी रेशम चित्ररथ यात्रा काढण्यात आली. यात राज्यातील सर्व जिल्ह्यातील रथ सहभागी झाले. यात भंडारा जिल्हाला उत्कृष्ठ रेशिम रथाला प्रथम क्रमांकाचा पारितोषिक देण्यात आला. वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते रेशीम विकास अधिकारी सी.के. बडबुजर व वरिष्ठ तांत्रिक सहायक ए.एम. ढोले यांना सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.

Web Title: Lessons of Silk Farming Through District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.