मुलींंना इच्छुक क्षेत्रात काम करण्याची मुभा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 09:44 PM2019-03-09T21:44:52+5:302019-03-09T21:45:15+5:30
मुलींना स्वतंत्र द्या, त्यांना ज्या क्षेत्रात काम करण्यासाठी इच्छा असेल त्या क्षेत्रात त्यांना काम करू द्यावे.प्रत्येक महिला ही कर्तृत्ववान आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर यांनी केले. राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी द्वारे संचालित राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : मुलींना स्वतंत्र द्या, त्यांना ज्या क्षेत्रात काम करण्यासाठी इच्छा असेल त्या क्षेत्रात त्यांना काम करू द्यावे.प्रत्येक महिला ही कर्तृत्ववान आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर यांनी केले.
राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी द्वारे संचालित राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी डॉ. अर्चना रणदिवे होत्या. यावेळी डॉ. निर्मल जयस्वाल, डॉ. अर्चना जयस्वाल, पशुधन विकास अधिकारी भाग्यश्री राठोड, शीला भांडारकर, संस्थाध्यक्ष आल्हाद भांडारकर, मुख्याध्यापिका संध्या हेमणे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. यावेळी संध्या हेमणे, नीता कटकवार यांना संस्थाभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धा आणि कर्तृत्ववान महिलांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी डॉ. भाग्यश्री राठोड यांनी महिलांचा दिन फक्त ८ मार्चला साजरा करतो. यापेक्षा रोज साजरा करावा अशी महिलांची कामगिरी आहे असे मत व्यक्त केले. डॉ. निर्मल जयस्वाल यांनी स्त्रियांना कमी लेखू नका, स्त्री पुरुषांपेक्षा जास्त प्रभावी असतात, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रीती पाटील, प्रास्ताविक डॉ.सोनाली भांडारकर आणि आभार संध्या हेमणे यांनी मानले.यावेळी विद्यार्थीनिंची लक्षणीय उपस्थिती होती.