विद्यार्थ्यांना धाकाऐवजी आपुलकीने बोलते करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 09:35 PM2019-02-06T21:35:51+5:302019-02-06T21:36:06+5:30
कोणत्याही अधिकारशाहीचा धाक न दाखवता विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद करून विद्यार्थी, शिक्षक व अधिकारी यांचे मैत्रीशिवाय प्रभावी शिक्षणाची आंतरक्रिया होत नसून विद्यार्थ्यांना धाक दाखवून अबोल करण्यापेक्षा आपुलकीने बोलके करा, असे प्रतिपादन भंडारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोणत्याही अधिकारशाहीचा धाक न दाखवता विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद करून विद्यार्थी, शिक्षक व अधिकारी यांचे मैत्रीशिवाय प्रभावी शिक्षणाची आंतरक्रिया होत नसून विद्यार्थ्यांना धाक दाखवून अबोल करण्यापेक्षा आपुलकीने बोलके करा, असे प्रतिपादन भंडारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड यांनी केले.
बालकांचा मोफत व शिक्षणाचा सक्तीचा अधिकार अधिनियमानुसार राज्यातील खाजगी शाळांची दरवर्षी वार्षिक तपासणी अंतर्गत पार्वताबाई वाठोडकर नवीन मुलींच्या शाळा तपासणी दरम्यान शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. शिक्षण विभागातील अधिकारी यांच्याकडे शाळा तपासणीचे अधिकार आहेत.
जिल्ह्यातील सर्व खाजगी शाळा तपासणीची मोहिम सुरू असून भंडारा शहरातील शाळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड यांच्याकडे आहेत.
शहरातील शाळा तपासणीसाठी त्यांनी गटसाधन केंद्रातील राम वाडीभस्मे, सरादे, मानवटकर यांची चमू तयार करून १ फेब्रुवारी पासून अत्यंत साधेपणाने शाळा तपासणीला सुरूवत केली. बालकांचा मोफत व शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार राज्यातील खाजगी अनुदानित विनाअनुदानित व अंशत: अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची वार्षिक तपासणी केल्याशिवाय शिक्षकांचे वेतन होत नाही.
त्यामुळे शाळांची वार्षिक तपासणी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यामार्फत करणे गरजचे असून तालुका निहाय शाळा तपासणीकरिता अधिकारी वर्गाकडे दिल्या जातात. भंडारा शहरातील खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा तपासणीचे अधिकार पंचायत समिती भंडाराचे गटशिक्षणाधिकारी राठोड यांचेकडे असून त्यांनी गटसाधन केंद्रातील राम वाडीभस्मे, सरादे, मानवटकर यांची चमू तयार करून कोणताही अधिकारशाहीचा आव न आणता अत्यंत साधेपणाने शाळा तपासणीला सुरूवात केली.
वर्ग निरीक्षणानंतर त्यांनी शिक्षकांची सभा घेवून गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणासाठीच्या उपाय योजनाबाबद शिक्षकांशी चर्चा केली. शिक्षकांच्या उणिवांवर लक्ष न देता सकारात्मक बाबीवर चर्चा करून शिक्षकांना पे्ररणादायक मार्गदर्शन केले.
शिक्षक, विद्यार्थी व अधिकारी यांचे मैत्रीशिवाय शिक्षणाची प्रभावी आंतरक्रिया होत नसून आपण तिन्ही घटक एकमेकांचे मित्र झाल्याशिवाय शिक्षणाचा पारदर्शक वसा पुढे जाणार नाही. केवळ शालेय रेकॉर्ड न तपासता विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, बौद्धिक व सर्वांगिण विकास तपासणे महत्वाचे आहे. कारण शालेय रेकॉर्ड अद्यावत करणे सोपे असून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता टिकवून अद्यावत ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले. विद्यार्थ्यांना अधिकाºयांची भिती न वाटता आदर करावा हीच आपल्या प्रामाणिक कामाची पावती होय, असे ही ते म्हणाले.