कोरोनाचे संकट लवकरच टळू दे आणि भगवंता तुझ्या मंदिराचे दरवाजे लवकर उघडू दे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:35 AM2021-04-21T04:35:01+5:302021-04-21T04:35:01+5:30
बॉक्स अनेक वर्षांची परंपरा यावर्षीही कोरोनामुळे थांबली भंडारा शहरात गेल्या काही वर्षापासून रामनवमी उत्सव निमित्ताने संपूर्ण शहरात शोभायात्रा काढण्याची ...
बॉक्स
अनेक वर्षांची परंपरा यावर्षीही कोरोनामुळे थांबली
भंडारा शहरात गेल्या काही वर्षापासून रामनवमी उत्सव निमित्ताने संपूर्ण शहरात शोभायात्रा काढण्याची परंपरा आहे. यानिमित्ताने येथे यात्रा भरली जात होती. मात्र यावर्षी कोरोना संकटामध्ये यात्रा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शीतला माता मंदिर परिसरात यावर्षी शांतताच दिसून येत आहे. येथे सर्वधर्मीय रामनवमीला एकत्र येतात. त्यानिमित्ताने अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र यावर्षी रामनवमी उत्सव साजरा होणार नसल्याने अनेक भाविकांनी जड अंतकरणाने आपली प्रतिक्रीया व्यक्त केल्या. अनेकांनी तर कोरोना संकट लवकरच टळू दे आणि भगवंता तुझ्या मंदिराचे दरवाजे लवकर उघडू दे अशी प्रार्थना अनेक जण करीत आहे.
बॉक्स
महाप्रसाद, शोभायात्रा झाल्या दुर्मिळ
रामनवमी निमित्ताने जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत होते. यासोबतच अनेक जण कीर्तन, प्रवचन, महाप्रसादाचे आयोजन मंदिर तसेच गावच्या पंचकमिटीतर्फे करण्यात येत होते. मात्र यावर्षी कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्याने गावोगावी होणारा रामनवमी उत्सव होणार नसल्याने आता शोभायात्रा महाप्रसाद, कीर्तनाचे कार्यक्रम हे दुर्मिळ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.