‘ते’ सिंचन प्रकल्प यावर्षी पूर्ण करू

By admin | Published: May 27, 2016 12:50 AM2016-05-27T00:50:36+5:302016-05-27T00:50:36+5:30

भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील ९० टक्के काम पूर्ण झालेल्या सिंचन प्रकल्पाचे उर्वरित काम गतीने करुन असे प्रकल्प यावर्षी पूर्ण करण्यात येतील.

Let's complete the 'irrigation project' this year | ‘ते’ सिंचन प्रकल्प यावर्षी पूर्ण करू

‘ते’ सिंचन प्रकल्प यावर्षी पूर्ण करू

Next

जलसंपदा मंत्र्यांची ग्वाही : प्रकल्पाच्या देखभाल दुरूस्तीसाठी ४०० कोटी मिळणार
भंडारा : भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील ९० टक्के काम पूर्ण झालेल्या सिंचन प्रकल्पाचे उर्वरित काम गतीने करुन असे प्रकल्प यावर्षी पूर्ण करण्यात येतील. यासाठी वनजमीन, भूसंपादन आणि निधीची अडचण तात्काळ मार्गी लावू, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.
भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघुसिंचन प्रकल्पाचा आढावा गुरूवारला जिल्हा परिषद सभागृहात घेण्यात आला. यावेळी ना. महाजन बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, आमदार चरण वाघमारे, आमदार विजय राहांगडाले, आमदार संजय पुराम, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय.एस.चहल, गोसेखुर्द प्रकल्प मुख्य अभियंता अविनाश सुर्वे, जिल्हाधिकारी धीरजकुमार, गोंदियाचे जिल्हाधिकारी विजय सुर्यवंशी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर उपस्थित होते.
गोसेखुर्द प्रकल्पाचे काम जलदगतीने पूर्ण करायचे आहे. प्रत्येक अधिकाऱ्यांकडे या प्रकल्पाची टप्पानिहाय अद्ययावत माहिती असली पाहिजे. त्याचबरोबर भूसंपादन किती, खातेदार किती, निधी खर्च, प्रकल्पातील अडचणी इत्यादी अद्ययावत माहिती सर्व आमदारांना देण्यात यावी, अशा सूचना प्रधान सचिव चहल यांनी केली. ९० टक्के काम पूर्ण झालेल्या ज्या प्रकल्पासाठी निधीची गरज आहे त्यासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करावा, अशी सूचनाही ना.महाजन यांनी केली.
सिंचन प्रकल्पांच्या देखभाल दुरूस्तीसाठी शासन लवकरच ४०० कोटी रूपये उपलब्ध करुन देणार आहे. या निधीतून प्रकल्पांची देखभाल दुरुस्तींची कामे पूर्ण होवून प्रकल्प पूर्ववत कार्यान्वित होतील, अशी माहिती महाजन यांनी दिली.
भिवरटोला कालव्याचे काम रेल्वेलाईनमुळे अडले आहे. रेल्वेलाईनच्या खालून पाईपलाईन टाकण्याचा प्रस्ताव असून रेल्वेची मंजुरी मिळताच हे काम सुरू होईल, असे सुर्वे यांनी सांगितले. या बैठकीला जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)

बावनथडीसाठी भूसंपादन डिसेंबरपर्यंत
बावनथडी प्रकल्पाचे कालव्यासाठी भूसंपादनाच्या रजिस्ट्रीचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. हा प्रकल्प सर्वार्थाने मार्च २०१७ पर्यंत पूर्ण करू, यासाठी शासनाने २०० कोटी रूपये दिले आहेत, असे सुर्वे यांनी सांगितले. गोंदिया जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाचा आढावा घेताना आमदार विजय राहांगडाले यांनी धापेवाडा सिंचन प्रकल्पाबाबत सदयस्थिती विचारली. धापेवाडा सिंचन प्रकल्पाचे अंदाजपत्रक एका आठवडयात सादर करू, तसेच बोदलकसा रायझिंग मेनच्या कामाचे अंदाजपत्रकही एक आठवडयात तयार करुन देऊ, याबाबत कालव्यांच्या ऐवजी बंद पाईपलाईन मधून पाणी देण्याचे शासनाचे धोरण चांगले आहे. यामध्ये भूसंपादन न करता कामे करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे सुर्वे यांनी सांगितले.
पाणीपट्टी भरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रेरित करा
टेकेपार आणि सोंडयाटोला उपसा सिंचन प्रकल्पाचे विद्युत बिलासाठी काही अनुदान शासनाने द्यावे अशी मागणी आमदार चरण वाघमारे यांनी केली. मात्र प्रत्येक बाबीसाठी शासन पैसे देऊ शकणार नाही. एका प्रकल्पाला सूट दिली तर सर्वच प्रकल्पासाठी अशी मागणी येईल आणि शासनाला हे परवडणारे राहणार नाही, अशी भूमिका ना. महाजन यांनी मांडली. त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी पट्टी भरावीच लागेल. आमदारांनी पाणीपट्टी भरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रेरीत करावे तसेच याबाबत जनजागृती करावी असे आवाहन महाजन यांनी यावेळी केले.

Web Title: Let's complete the 'irrigation project' this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.