अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 10:31 PM2019-07-01T22:31:32+5:302019-07-01T22:31:48+5:30

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी, किमान वेतन, पेन्शन, आजारपणातील रजा आदीच्या कायद्यासाठी लोकप्रतिनिधींनी लोकसभा व विधान सभेत चर्चा करावी व न्याय मिळवून द्यावा, असे प्रतिपादन अंगणवाडी कर्मचारी युनियन आयटकचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे यांनी केली.

Let's discuss the demands of Anganwadi workers | अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करावी

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करावी

googlenewsNext
ठळक मुद्देदिलीप उटाणे : भंडारा येथे अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे जिल्हा अधिवेशन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी, किमान वेतन, पेन्शन, आजारपणातील रजा आदीच्या कायद्यासाठी लोकप्रतिनिधींनी लोकसभा व विधान सभेत चर्चा करावी व न्याय मिळवून द्यावा, असे प्रतिपादन अंगणवाडी कर्मचारी युनियन आयटकचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे यांनी केली.
शारदा लॉन्स भंडारा येथे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक जिल्हा भंडाराचे पाचवे त्रैवार्षिक भंडारा जिल्हा अधिवेशन सविता लुटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
अधिवेशनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा कुरसुंगे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अतिथी म्हणून आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, आयटकचे जिल्हाध्यक्ष माधवराव बांते, जिल्हा सचिव हिवराज उके, जिल्हा परिषद सदस्य पंचबुद्धे उपस्थित होते.
यावेळी उद्घाटक कुरसुंगे म्हणाल्या, मोबाईलचा उपयोग करणे आवश्यक आहे आणि ज्यांचा मोबाईल अपघाताने व इतर कारणाने खराब झाल्यास त्यांचे पैसे कपात होणार नाही. आपल्या स्थानिक मागण्या त्वरीत सोडवल्या जातील. आमदार अ‍ॅड. अवसरेंनी कर्मचाºयांना नेहमीच सहकार्य केले आहे आणि यापुढेही करेन, अशी ग्वाही दिली.
सरकारने वेतन श्रेणी लागू केली, पण २०१९ ला जाहीर केलेली मानधन वाढ अजूनपर्यंत मिळाली नाही. फक्त आश्वासन दिले जातात. तसेच ९ मार्च २०१७ च्या मानधनवाढ कमिटीची शिफारस अजून मान्य झाली नाही.
जिल्हा कार्याध्यक्ष हिवराज उके यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण २०१९ हे अंगणवाडी कर्मचाºयांसाठी कसे घातक आहे हे सांगितले. भंडारा जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाºयांचे या तीन वर्षात दुखद निधन झाले. त्या सर्वांना यावेळी सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.
पुढील तीन वर्षासाठी १८ लोकांची कार्यकारिणी व ७५ लोकांची अंगणवाडी कर्मचाºयांची जिल्हा कौंसिलची सर्व सम्मतीने निवड करण्यात आली. अधिवेशनाला सुमारे हजारो अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते. त्यात प्रामुख्याने मंगला गजभिये, रिता लोखंडे, अल्का बोरकर, गौतमी मंडपे, मंगला रंगारी, सुनंदा चौधरी, शमीम बानो खान, सुनंदा बडवाईक, छाया क्षीरसागर, अनिता घोडीचोर, विजया काळे, कुंदा भदाडे, मनिषा गणवीर, जयनंदना कांबळे, सुनंदा हेडावू, संगिता मारबते, मंगला गभने, छाया गजभिये आदी कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Let's discuss the demands of Anganwadi workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.