विकासासाठी निधी खेचून आणू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 10:58 PM2018-03-31T22:58:39+5:302018-03-31T22:58:39+5:30

शासनाने गावागावातील विकासाकरिता निधीची तरतूद केली आहे. हा निधी विविध योजनेअंतर्गत देण्यात येतो. मात्र हा निधी आपल्या क्षेत्रात खेचून आणण्याची क्षमता व जनसेवा करण्याची इच्छा असणाऱ्यांनाच मिळते.

Let's pull up the funds for development | विकासासाठी निधी खेचून आणू

विकासासाठी निधी खेचून आणू

Next
ठळक मुद्देरमेश डोंगरे : कुंभली जि.प. क्षेत्रअंतर्गत विविध कामांचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : शासनाने गावागावातील विकासाकरिता निधीची तरतूद केली आहे. हा निधी विविध योजनेअंतर्गत देण्यात येतो. मात्र हा निधी आपल्या क्षेत्रात खेचून आणण्याची क्षमता व जनसेवा करण्याची इच्छा असणाऱ्यांनाच मिळते. यासाठी प्रयत्न करावे लागतात. निधी खेचून आणण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते नेहमीच तत्पर राहतात. त्यामुळे त्यांच्या जि.प. क्षेत्रात निधीची कमतरता भासू देणार नाही, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी केले.
कुंभली जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध कामाचे भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी बोदरा येथे मनोरंजन कार्यालयात ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर, जि.प. सदस्य होमराज कापगते, गटविकास अधिकारी सुनिल तडस, महिला काँग्रेस कमेटीच्या तालुकाध्यक्षा छाया पटले, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष जासवंत कापगते, विस्तार अधिकारी टेंभरे, पं.स. माजी सदस्य हरिभाऊ हरडे, सरपंच सरिता राऊत, सरपंच हरिश लांडगे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भोजराम फुलबांधे, पोलीस पाटील दिपक कापगते उपस्थित होते.
यावेळी जि.प. सदस्य होमराज कापगते म्हणाले, गावागावात विकास कामे करतांना अनेक अडचणी येतात. मात्र अडचणीवर मात करुन कामे करावी लागतात. समाजसेवा करतांना राजकारण आड आणू नये. राजकारण आणल्यास विकास कामात अडचण निर्माण होते. ही विकासकामे करतांना जनतेचे सहकार्य अपेक्षीत आहे.
उपस्थित पाहुण्यांचे हस्ते बोदरा जांभळी निलागोंदी रस्ता, जांभळी मकरधोकडा बोदरा रस्ता, गुडरीटोली, गुडरी रस्ता, जि.प. शाळा बोदरा आवारभिंत, गिरोला बोडे रपटा दुरुस्ती, गिरोला दलित वस्ती सुधारणा अंतर्गत सिमेंट रस्ता, बोदरा दलीत वस्ती सुधारणा अंतर्गत सिमेंट रस्ता, मुंडीपार दलितवस्ती सुधारणा अंतर्गत सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन ग्रामसेविका जी. ए. गेडाम यांनी केले. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Web Title: Let's pull up the funds for development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.