मराठी भाषेला विश्वात सर्वदूर नेऊया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:37 AM2021-05-07T04:37:18+5:302021-05-07T04:37:18+5:30
त्या महाराष्ट्र दिनानिमित्त मराठी पाऊल पडते पुढे या ऑनलाईन कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणातून बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमासाठी उद्घाटक ...
त्या महाराष्ट्र दिनानिमित्त मराठी पाऊल पडते पुढे या ऑनलाईन कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणातून बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून प्रसिद्ध साहित्यिक डॉ. अनुपमा उजगरे तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठी अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड, अनाथांची माय सिंधूताई सपकाळ, मंजिरी कुलकर्णी, डॉ. शोभा रोकडे, आम्ही विश्व लेखिकाच्या अध्यक्ष प्रा. पद्मा हुशिंग, उपाध्यक्ष प्रा. विजया मारोतकर, आम्ही विश्व लेखिकाच्या भंडारा जिल्हाध्यक्ष कविता कठाणे, यवतमाळच्या जिल्हाध्यक्ष निशा डांगे, साताऱ्याच्या शुभांगी दळवी, कारंजा लाड येथील उज्ज्वला इंगळे, ठाणे येथील संगीता चव्हाण व अस्मिता चौधरी, जयश्री जोगळेकर यांच्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक लेखिका, कवयित्री सहभागी झाल्या होत्या.
यावेळी मराठी अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांनी जीवन जगताना आपल्यातले चांगले गुण शोधून अधिकाधिक उन्नत करताना जे काही उणे आहे त्याची वजाबाकी न करता ते सुधारण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या. सिंधूताई सपकाळ यांनी ऑनलाईन कार्यक्रमाचे कौतुक करीत नवोदित स्त्री साहित्यिकांचे कौतुक केले. आम्ही विश्व लेखिकाचे संस्थापक मोहन कुलकर्णी यांच्या पत्नी मंजिरी कुलकर्णी यांनी महिलांची स्वप्ने पूर्ण होतील अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी अमरावतीच्या साहित्यिक डॉ. शोभा रोकडे यांनी वैदर्भीय मातीचा दरवळ, आम्ही विश्व लेखिकाच्या मंचाला सुगंधित करून गेला काव्य सादर केले. संस्थेच्या अध्यक्ष पद्मा हुशिंग यांनी प्रास्ताविकातून आम्ही विश्व लेखिकाच्या भूमिकेची कल्पना विशद केली. यवतमाळच्या स्मिता भट यांनी सरस्वती वंदन सादर केले. महाराष्ट्र दिनाचे गीत संपदा दळवी यांनी गायले. या कार्यक्रमात अनेक महिला साहित्यिकांनी सहभागी होऊन मराठी पाऊल पडते पुढे , माझी माय सरस्वती, महाराष्ट्राची सांस्कृतिक जडणघडण आदी विषयांवर आपले कथा, कविता, लेखांचे ऑनलाईन सादरीकरण केले. संचालन निशा डांगे व कविता कठाणे, जयश्री जोगळेकर यांनी केले तर आभार प्राध्यापक विजया मारोतकर यांनी मानले.