भंडारा येथे नवीन औद्योगिक वसाहतीसाठी प्रयत्न करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:34 AM2021-02-13T04:34:39+5:302021-02-13T04:34:39+5:30
भंडारा लघू उद्योजक संस्था, मेटल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन व भंडारा व्यापारी संघ यांच्या विद्यमाने आयोजित व्यापारी उद्योजकांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ...
भंडारा लघू उद्योजक संस्था, मेटल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन व भंडारा व्यापारी संघ यांच्या विद्यमाने आयोजित व्यापारी उद्योजकांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. भंडारा जिल्हा महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात आघाडीवर येण्यासाठी तसेच या ठिकाणच्या व्यापाराला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर तर्फे सहकार्य करण्याच्या दृष्टीने, व्यापार उद्योग क्षेत्राला जीएसटी, फूड सेफ्टी, तसेच अन्य कायद्यांमध्ये येणाऱ्या अडचणी समजून घेणे व सरकारदरबारी त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणे याविषयी ललित गांधी यांनी मार्गदर्शन केले.
मेटल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष पंकज सारडा यांनी प्रास्ताविकात व्हायब्रंट भंडारा या संकल्पनेचे प्रेझेंटेशन केले. भंडारा हा गुंतवणुकीसाठी योग्य जिल्हा असून या जिल्ह्यामध्ये गुंतवणुकीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे आग्रही प्रतिपादन केले. याप्रसंगी भंडारा लघुउद्योग संस्थेचे अध्यक्ष रामविलास सारडा, किराणा असोसिएशनचे अनिल मल्होत्रा, मेटल असोसिएशनचे सचिव द्वारकाप्रसाद सारडा, चार्टर्ड अकाउंटंट मुंदडा, कौन्सिल सदस्य संदीप भंडारी व विनयकुमार उपस्थित होते. पोर्टलच्या माध्यमातून सर्व व्यापाऱ्यांना आपला व्यापार ऑनलाईन पद्धतीने करून आपला व्यापार वाढवण्याच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. व्यापारी उद्योजकांच्या विकासासाठी, राज्याची शिखर संस्था म्हणून काम करत असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज मध्ये भंडारा जिल्ह्यातील सर्व व्यापारी, उद्योजकांच्या संस्था संघटना व व्यापारी उद्योजकांनी सभासद होऊन सहभागी व्हावे व विकासाच्या नवीन संधीचा उपयोग करून घ्यावा असेही त्यांनी सांगितले. संचालन पुनर्वसु काबरा यांनी तर आभार पंकज सारडा यांनी मानले.