ग्रंथालय कर्मचारी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 10:00 PM2018-08-11T22:00:32+5:302018-08-11T22:01:06+5:30
ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होत नसल्यामुळे ग्रंथालय कर्मचाऱ्यांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. या कर्मचाऱ्यांवर कामाचा अधिक ताण असतानाही शासन मात्र त्यांच्या समस्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होत नसल्यामुळे ग्रंथालय कर्मचाऱ्यांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. या कर्मचाऱ्यांवर कामाचा अधिक ताण असतानाही शासन मात्र त्यांच्या समस्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे.
सार्वजनिक ग्रंथालय कायदा १९६७ मध्ये पारित झाला. त्याला यावर्षी ५० वर्षे पूर्ण झालीत. तेव्हापासून ग्रंथालय कर्मचारी न्याय्य मागण्यांसाठी सातत्याने संघर्ष करीत आहेत. परंतु अनुदानामध्ये तुटपूंजी वाढ करून ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करण्यात येत आहे. सात वर्षामध्ये ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या वेतनात दमडीचीही वाढ झालेली नाही. एकीकडे महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ग्रंथालय सारख्या ज्ञानदानाचे काम करीत असलेल्या गं्रथालयावर संकट ओढावले आहे. ग्रंथालय कायद्याचे सुवर्ण महोत्सवाचा वर्ष साजरा करीत असताना समाजाला सुसंस्कारित व वाचन संस्कृतीकडे नेणाºया ग्रंथालय कर्मचाऱ्यांची अवस्था चिंतनीय आहे. समस्यांचा डोंगर वाढत आहे. शासन प्रशासन त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे.
जिल्हा सार्वजनिक गं्रंथालय कर्मचारी संघाने निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांना मागण्यांचे निवेदन सोपविले. यावेळी ग्रंथालयीन कर्मचारी राजकुमार हटवार, इस्तारी मेंढे, विश्वनाथ बोदेले, बंडूजी झिंगरे, काका भोयर, घनश्याम कानतोडे, महेश साखरवाडे, सुधीर खोब्रागडे, दिनेश घरडे, युवराज साठवणे, सुभाष साकुरे, सीमा मेंढे, महेंद्र जुमडे, गंगाधर शिवणकर, गोमासे, शैलेश सुखदेवे, सय्यद शाहीद, इमरान पठाण, देवेंद्र मोटघरे, राजू मासूरकर, किशोर इळपाते, सुरेश आकरे आदींचा सहभाग होता.