कमर्चाऱ्यांना कामकाजासाठी ग्रंथालय उपयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2017 12:33 AM2017-03-31T00:33:17+5:302017-03-31T00:33:17+5:30
अधिकारी व कमर्चाऱ्यांना कामकाज करतांना वेळोवेळी कायद्याचा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे संदर्भासाठी हे ग्रंथालय तयार करण्यात आले असून याचा लाभ कमर्चाऱ्यांना निश्चितच होईल.
अभिजीत चौधरी याचे प्रतिपादन : जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ग्रंथालयाचे उद्घाटन
भंडारा : अधिकारी व कमर्चाऱ्यांना कामकाज करतांना वेळोवेळी कायद्याचा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे संदर्भासाठी हे ग्रंथालय तयार करण्यात आले असून याचा लाभ कमर्चाऱ्यांना निश्चितच होईल. कायदाविषयक पुस्तकांसोबतच स्पर्धा परिक्षा, मनोरंजन व इतर अवांतर पुस्तकांचाही यात समावेश आहे. या ग्रंथालयाचा सर्व कमर्चाऱ्यांनी लाभ घेऊन आपले दैनंदिन कामकाज सुरळीतपणे करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविण्यपूर्ण योजनेतून २ लाख रुपयांचा निधी खर्चून जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कमर्चाऱ्यांसाठी अद्ययावत असे ग्रंथालय तयार करण्यात आले आहे. या ग्रंथालयाचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी फित कापून केले. त्यावेळी ते बोलत होते. अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रदीपकुमार डांगे, निवासी उपजिल्हाधिकारी अशोक लटारे, उपजिल्हाधिकारी सुनिल पडोळे, विजय उरकुडे, विजया बनकर, सुजाता गंधे, जी.जी. जोशी, पुरवठा अधिकारी रमेश बेंडे, अधीक्षक वरुण शहारे उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनी ग्रंथालयाचे निरिक्षण करुन पुस्तकांविषयी माहिती जाणून घेतली. तसेच ग्रंथालयीन नोंदी अद्ययावत ठेवण्याच्या सूचना केल्या.
या ग्रंथालयात कमर्चाऱ्यास उपयुक्त पुस्तकासोबतच इतर साहित्य, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मनोरंजनाचे पुस्तकही उपलब्ध आहेत. नेहमी मानसिक तणावामध्ये राहणाऱ्या कमर्चाऱ्यांना कामकाजातून विरंगुळा म्हणून ही पुस्तके उपयुक्त ठरणार आहेत. या ग्रंथालयात एक कमर्चारी नियुक्त केला असून दैनंदिन नोंदी करण्यासाठी तो उपलब्ध राहणार आहे. हे ग्रंथालय कमर्चाऱ्यासाठी सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. कमर्चाऱ्यांच्या पाल्यांना स्पर्धा परिक्षा मार्गदशर्नासाठीही ही पुस्तके उपलब्ध राहणार आहेत. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कमर्चारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)